महेन्द्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
संगमनेर-: शेळी बकऱ्याच्या लालसेने गेलेल्या बिबट्याने एका 62 वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला चढवीत महिलेच्या मानेला पकडून तिला फरपटत ५०० ते १००० फूट जंगलात ओढत नेल्याची घटना ६ सप्टेंबरला पहाटे पाचच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द परिसरात घडली आहे.
मिराबाई रामभाऊ मेंगाळ वय 62 रा सावरचोर मेंगाळवाडी असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या वयोवृद्ध महिलेचे नाव आहे. मूळचे सावरचोर मेंगाळवाडी येथील रहिवासी असणाऱ्या मीराबाई रामभाऊ मेंगाळ ही महिला निमगाव खुर्द शिवारातील चंदन टेकडी परिसरात राहत होत्या.
त्या शेळ्या पाळून आपला उदरनिर्वाह करत असे, वृद्ध महिला सोमवारी आपल्या छपरामध्ये अंगावर काळ्या रंगाची घोंगडी घेऊन झोपलेली होती. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास झोपेमध्ये असताना अचानक शेळीच्या शिकारीच्यालालसेने आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला अन त्या महिलेच्या मानेला पकडून पाचशे ते हजार फूट अंतरापर्यंत ओढत नेल्याने महिलेच्या गळ्याला व छातीला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
हल्ला झाल्याची माहिती निमगाव खुर्द गावच्या वन कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब गोपाळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांना दिली, तर गावचे पोलीस पाटील गोरक्ष गोपाळे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे, वन पथकातील वनपाल संगीताताई कोंढार, जोशना बेंद्रे, वराकेश कोळी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.