मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 वा पुण्यतिथी महोत्सव दि 2 नोव्हेबरला गुरुकुंज मोझरी येथे साजरा झाला. या पुण्यतिथी कार्यक्रमात हिंगणघाट येथील रुग्णमित्र गजू कुबडे यांचा राष्ट्रीय कीर्तनकार व प्रबोधनकार सत्यपाल महाराज व सप्तखंजरी वादक भाऊसाहेब थुटे, वस्त्र उद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, गुरुकुल आश्रम मोझरीचे संचालक रवी मानव यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ व सन्मान पत्र देऊन कुबडे यांच्या 22 वर्षा पासून सुरु असलेल्या रुग्णसेवेचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना गुरुकुलचे संचालक रविदादा मानव यांनी रुग्णसेवेचे कामे जी गजू कुबडे करीत आहेत त्याला तोड नाही. त्यांच्या ह्या मानव जातीच्या निःस्वार्थ भावनेने करीत असलेल्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले. गुरुकुल आश्रमाने केलेल्या रुग्णसेवाव्रती पुरस्कार देऊन केलेल्या सन्मानाबद्दल आभार मानले आहे.

