हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन चंद्रपूर:- बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली “दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा” या धम्म संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केल्या जातो. भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा पश्चिम विभागाच्या वतीने आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या कालावधी मध्ये चंद्रपूर जिल्ह्य पश्चिम विभागातील 6 तालुके आणि चंद्रपूर शहर मध्ये एकाच वेळेस 45 बुद्ध विहार मध्ये, केंद्राने दिलेल्या आदेशाप्रमाणे 24 विषया वर मार्गदर्शन धम्म प्रवचन करण्यात आले आणि धम्माचा प्रचार चंद्रपूर शहरापासून तर ग्रामीण भागातील खेड्या पर्यंत करण्यात आला.
या वर्षवास धम्म प्रवचन मालिकेचा जिल्हास्तरीय समारोपीय कार्यक्रम, 45 बौद्ध विहारचे पदाधिकारी याना एकत्रित घेऊन, दीक्षाभूमी चंद्रपूर येथे दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रविवार ला घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेच्या नियम प्रमाणे संस्कार विभागाचे उपाध्यक्ष संदीप सोनोणे जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग हे होते. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून अरुण घोटेकर अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर हे होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक इंजी. नेताजी भरणे जिल्हाध्यक्ष, एड जगदीप खोब्रागडे जिल्हा सरचिटणीस, अशोक घोटेकर विदर्भ प्रदेश अध्यक्ष भा बौ म, प्रफुल भगत जिल्हा उपाध्यक्ष, आयु.नी. सुजाताताई लाटकर जिल्हा उपाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षिका, सपनाताई कुंभारे जिल्हा उपधक्ष्या तथा केंद्रीय शिक्षिका उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती भीमलाल साव माजी जिल्हाध्यक्ष, कैविसताई मेश्राम माजी जिल्हाध्यक्ष, वरोरा तालुक्याचे अध्यक्ष एड अरविंद पेटकर शहराच्या अध्यक्षा कविताताई खैरे, भद्रावती शहराचे अध्यक्ष मिलीताई वाघ तालुक्याचे अध्यक्ष राकेश रंगारी, चंद्रपूर तालुक्याचे अध्यक्ष जी एस फुलझेले, चंद्रपूर शहराचे सरचिटणीस किशोर तेलतुंबडे, बल्लारपूर शहराच्या अध्यक्षा गायत्रीताई रामटेके तालुक्याचे अध्यक्ष ऍड रमण पुणेकर, राजुरा तालुक्याचे अध्यक्ष धर्मुजी नगराळे, सरचिटणीस गौतम चौरे, कोरपना तालुक्याचे अध्यक्ष श्रावण जीवने, स्मिताताई नागदेवे, कांचशीला उके, नम्रताताई वावरे, ज्योतीताई सहारे तसेच सर्व जिल्ह्याच्या केंद्रीय शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
प्रथमता तथागत भ.गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती मूर्तीला अरुण घोटेकर, जिल्हाध्यक्ष नेताजी भरणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप सोनोणे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित करून, दीप प्रजलत करून, पुष्प अर्पण करून आदर्शाना वंदन केले. यानंतर जिल्ह्याचे सचिव बौद्धचार्य कृष्णाक पेरकावर यांनी उपस्थित सर्वांना त्रिशरण पंचशील दिले. या कार्यक्रमामध्ये स्वागत गीत सुनीताताई कांबळे अध्यक्षा भिवापूर शाखा तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका यांनी,
भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई महा उपासिका मीराताई आंबेडकर यांच्या स्फूर्ती गीताने सुरुवात केली. यानंतर धम्म मंचावरील सर्व पाहुण्यांचे पुस्प गुच्यानी स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णाक पेरकावर यांनी सविस्तरपणे भा बौ म चंद्रपूर जिल्हाच्या कार्य बाबत, कशा पद्धतीने बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. याबद्दलची सविस्तर मांडणी केली.
जिल्ह्यामध्ये या दोन वर्षात 40 महिला धम्म उपासिका शिबीरे राबविण्यात आले, दोन श्रामनेर शिबिर तसेच बाल धम्म संस्कार शिबिरे,समता सैनिक दल चे शिबिरे घेण्यात आली.चंद्रपूर दीक्षाभूमी वर बौद्ध धम्म परिषद चे आयोजन करून, भा बौ म चे कार्याध्यक्ष, बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांना आणण्यात आले. चलो बुद्ध की और- बुद्ध विहार जोडो अभियान अंतर्गत, यावर्षी 45 बौद्ध विहारांमध्ये वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन करून, सर्व 45 बौद्ध विहारच्या पदाधिकारियाना एकत्रित बोलऊन हा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला.
इतका मोठा कार्यक्रम एकत्रित पणे राबविन्याचा मान चंद्रपूर जिल्हा ला जातो.आद अरुण घोटेकर साहेब यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकारी च्या कार्याचे मनभरून कौतुक केले आणि भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यानंतर ज्या विहारात प्रवचन मालिका घेण्यात आली त्या बाबत 6 तालुक्यामधून आलेले बौद्ध धम्म उपासक उपासिका यांचे मनोगत घेण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन झाले. या नंतर जिल्ह्यातील 45 बौद्ध विहार चे पदाधिकारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या धम्म प्रवचन मालिकेला तीन महिने सतत मार्गदर्शन करणारे जिल्ह्याचे केंद्रीय शिक्षक शिक्षिका आणि पदाधिकारी या सर्वांना सुद्धा सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शेवटी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आणि मनोगत व्यक्त करताना जिल्ह्याचे अध्यक्ष इंजी नेताजी भरणे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की हा सन्मान केंद्रीय शिक्षक शिक्षिका जे धम्म प्रचारक यांचा केलेल्या कार्याचा असून त्यांच्यावर भारतीय बौद्ध महासभेची फार मोठी जबाबदारी आहे आणि पुढच्या वर्षी याहीपेक्षा 100 बौद्ध विहारांमध्ये हे धम्म प्रवचना मालिका राबविन्याची अपेक्षा व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सुंदर संचालन आयुनि सपना ताई कुंभारे जिल्हा उपाध्यक्ष यानी केले.यानंतर सामूहिक सरनत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील 6 तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणात विहाराचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला.

