युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील कळमेश्वर तालुक्यातील 21 ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसळी मारत भाजपाला जोर का झटका मारमात दिला आहे. त्यामुळे नागपुर जिल्हातील राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांना जोरदार फटका बसला आहे.
दिनांक 6 नोव्हेंबरला कळमेश्वर तहसील कार्यालय झालेल्या मतमोजणी मध्ये काँग्रेसचे 17 जागा सरपंच निवडून आले. तर चार ठिकाणी भाजपाने बाजी मारली यामध्ये तालुक्यात सर्वात मोठी समजली जाणारी धापेवाडा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत काँग्रेसने अवघ्या सहा मताने भाजपाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मात करून विजय मिळविला.
निवडून आलेल्या काँग्रेसचे सरपंच पुढील प्रमाणे आहेत धापेवाडा – मंगला शेटे, बोरगाव खुर्द – महादेव वानखेडे, भडांगी – सिताराम उईके, झुनकी – विनोद राऊत, कन्याढोल – लाल मोहम्मद, मालाधरी खैरी लखमा – वर्षा निंबुळकर, तोंडा खैरी – ईश्वर डोमके, सावली – माला निकोसे, निमजी – वनिता तेलंगराव, आष्टीकला – ज्योती नेघे, लिंगा – प्रशांत पाटील, तिडगी – रामभाऊ मारबते, नांदिखेडा – देवेंद्र बोधे, खापरी कोठे – मधुमती तांगडे, चाकडोह – शारदा बरखाडे, सुंदरी – सरिता काळे, मोहगाव – आशुतोष तभाने तर भाजपाचे निवडून आलेल्या सरपंचामध्ये सावळी खुर्द – प्रियंका चोरे, दहेगाव – शिल्पा मानकर, लोणारा – आशिष डेहनकर, लोहगड – मोनाली टेकाडे याचा समावेश आहे.
यावेळी मतमोजणी कळमेश्वर तहसीलदार रोशन मकवाने व नायब तहसीलदार ज्योती जाधव, संदीप तडसे, विष्णू मुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तर वरिष्ठ लिपिक बिलाल खान हर्षल गोहने आदींनी सहकार्य केले.

