आशिष गजभिये, प्रतिनिधी
नागपूर:- जिल्हातील जेष्ठ पत्रकार युवराज मेश्राम यांची महाराष्ट्र संदेश न्यूजच्या विदर्भ ब्युरो चीफ पदी नियुक्ती झाल्याबद्दल याचं सर्विकडे शुभेच्या देऊन अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र संदेश न्युजचे संपादक मा. प्रशांत जगताप यांनी केली आहे. जेष्ठ पत्रकार युवराज मेश्राम गेल्या तीस वर्षापासून सामाजिक कार्य करीत असताना, अनेक अडचणी आल्या. आर्थिक परिस्थिती जेमतेम सामाजिक कार्याची जाण असल्यामुळे ते मागे न हटता, सामाजिक न्यायाची लढाई लढत राहिले व गेल्या पंचवीस वर्षापासून ते पत्रकारिता करीत आहे.
वीस वर्ष अगोदर विदर्भ पत्रिका हे साप्ताहिक पेपर काढून जनमानसाच्या समस्या पत्रिकेच्या माध्यमातून मांडून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले. आज ते अनेक सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रात कार्य करीत आहेत. यांनी नागपूर पत्रिका, दैनिक लोकमत या पेपरमध्ये वार्ताहर म्हणून काम केलेले आहे.
महासागर या दैनिक पेपरचे कळमेश्वर तालुका प्रतिनिधी असून इलेक्ट्रॉनिक मीडिया स्टार महाराष्ट्र न्यूज चैनल त्याचप्रमाणे मिडीया वार्ता न्यूज, विदर्भ कल्याण न्यूज चैनलचे जिल्हा प्रतिनिधी होते. पब्लिक ॲप तालुका प्रतिनिधी पदी ते कार्यरत आहेत. कळमेश्वर तालुक्यातील जनसामान्यांच्या विविध प्रश्नावर आवाज उठणारी पत्रकार संघटना म्हणजे नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघ, या संघाची कळमेश्वर तालुका कार्याध्यक्षपदी युवराजजी मेश्राम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. आज पर्यंत तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्याचप्रमाणे आसामचे तत्कालीन राज्यपाल प्रकाशजी पाटील साहेब यांनी मेश्राम यांना अनंतराव काणे या आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
5 सप्टेंबर 2022 ला युवराज मेश्राम यांची महाराष्ट्र संदेश न्यूजच्या विदर्भ ब्युरो चीफ या पदावर नियुक्ती करण्यात आली. या नियुक्ती बद्दल विदर्भ शाहीर कलाकार परिषद तालुका अध्यक्ष कळमेश्वरच्या वतीने व नागपूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे या अरुण वाहने, राहुल वानखेडे, भुजंग भोजनकर, बबन वानखेडे, मायाताई गणोरकर, अनिल अडकिणे, शांताराम ढोके, भगवान चांदेकर, उत्तम बागडे, रशीद शेख, कैलास प्रीतम मरडवार, संजय चौधरी, सुधीर घोडे सर व जिल्ह्याच्या वतीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे