पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे,दि.5 सप्टेंबर:- हॉटेल, पब, बार चेक करीत असताना हॉटेल रोव्ह (प्लन्ज) हे रात्री उशिरापर्यंत चालु रहात असल्याची माहिती मिळाल्यावरुन कोरेगाव पार्क हॉटेल रोव्ह (प्लन्ज) या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर व राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांचे पथकाने संयुक्तपणे पाहणी केली असता हॉटेल रोव्ह (प्लज) मधील दि. ०३ सप्टेंबर रोजीचे CCTV फुटेज पाहुन चेक केले असता पहाटे ०५/०० चा. पर्यंत हॉटेल रोव्ह (प्लन्ज) हे चालु असल्याचे दिसुन आले तसेच इतर अनेक त्रुटी आढळुन आल्या. त्याबाबत राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग, बीट क्रं १ पुणे चे दुय्यम निरीक्षक श्री विरेंद्रसिंह व चौधरी यांनी संयुक्त रिपोर्टसह पंचनामा करुन याबाबत कारवाई केली आहे.
सदर पबवर पुढील कारवाईसाठी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे राज्य उत्पादन शुल्क मार्फत कारवाई करण्यात येत आहे..
सदरची कारवाई श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री श्रीनिवास घाडगे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच पोउपनि श्रीधर खडके, पोलीस अंमलदार अयज राणे, मनिषा पुकाळे, प्रमोद मोहिदे, पुष्पेंद्र चव्हाण व राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग, बीट क्रं १ पुणे या पथकाने केली आहे.