युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
नागपूर :- जील्हातील खापा नगर परिषद अंतर्गत विविध ठिकाणी तसेच प्राथमिक , ऊच्च प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन आनंद उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध ,कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . नगर परिषद खापा यांच्या विद्यमाने स्वातंञ्याचा अमृत महोत्सव निमित्त्याने रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, संविधान लेखन प्रास्ताविक लेखन, कबड्डी, खोखो, चिञकला, राष्ट्रगीत गायन, वकृत्व स्पर्धा आदि विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षक दिनी नगर परिषद राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंञ्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध शालेय स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नगर परिषदे च्या वतीने नविन वस्ती येथील सामुदायिक भवन येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदचे मुख्याधिकारी ऋचा धाबर्डे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन खापा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजय मानकर, राजेंद्र हायस्कुलचे मुख्याध्यापक मोरकर आदिंची उपस्थिती होती.
चित्रकला स्पर्धा गटात भुमिका राऊत प्रथम, ब गटात आयुषी बावने प्रथम, निबंध स्पर्धा अ गटात सोफीया सुभेदार प्रथम, ब गटात मंजुशा मेश्राम प्रथम, वक्तृत्व स्पर्धा अ गटात तेजस्विनी पटेल प्रथम, जय बावनकुळे द्वितीय, रांगोळी स्पर्धा अ गटात मृणाली ऊईके प्रथम, ब गटात अनुष्का वाजे प्रथम, न.प.कस्तुरबा प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नी चिञकला स्पधेत वंश तायवाडे प्रथम,हिराल बोंदरे द्वितीय, स्वरा रोकडे तृतीय क्रमांक पटकाविला. संविधान प्रास्ताविका लेखन स्पधेत डाली धकाते प्रथम, रिध्दिमा किशोर गणविर द्वितीय, आरोही ढोके हिने तिसरा क्रमांक पटकाविला.
अश्याप्रकारे जिजामाता, जवाहर हायस्कुल, राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय, गांधी प्राथमिक आदि शाळेच्या विद्यार्थी विविध स्पधेत विजयी ठरले. विजयी स्पर्धकांना मुख्याधिकारी ऋचा धाबर्डे व खापा थानेदार अजय मानकर यांचे हस्ते ट्राफी,मेडल व प्रशिती प्रञ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी नेहारे, खडसे, बोकडे विविध शाळांचे शिक्षक, पालक आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन चामोटे मॅडम यांनी केले तर आभार मोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नगर परिषद कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.