25 फुट उंच तथागत गौतम बुद्ध भव्य मूर्तीची 20 धम्म दानदात्यांच्या सहकार्याने होणार स्थापना.
दिपक लक्ष्मण खंडारे, अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जी:- विपश्यना केंन्द्र पर्यटन स्थळ चिंचोना निमखेड बाजार शिवार येथे विदर्भातील क्रमांक 2 ची स्थापित होत असलेली 25 फुट उंच तथागत भगवान गौतमबुद्ध यांची भव्य मुर्ती ज्या 20 धम्मदान दात्यांच्या सहकार्यातुन प्रत्येकी तिस हजार रुपये यांच्या धम्मदानातुन पुर्ण होत आहे.
आज जगाला तथागत गौतम बुद्धाने सांगितलेल्या विचाराची शिकवणीची गरज आहे. बुद्धाचे विचार प्रत्येक मनुष्य मात्रासाठी दिपस्तभाचे काम करत आहे. या माध्यमातून बोधीसत्व चॅरीटेबल टूस्ट बुद्धाचे विचार घरोघर पोहचणार असून सर्वाचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून येथे बुद्धाची प्रतिमा स्थापित करण्यात येणार आहे.
तरी त्या पैकी धम्मदान दाते तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधिरजी डोंगरे साहेब पंचायत समिती अंजनगाव सुर्जी यांनी आज सोमवार दि.5 सप्टेंबर रोजी स्वःता समेतीला बोलावुन तिस हजारचा चेक बोधीसत्व चॅरीटेबल टूस्टच्या नावे टूस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आठवले, उपाअध्यक्ष उमेशभाऊ इंगळे, सचिव भानुदासभाऊ वानखडे, सदस्य प्रशांतभाऊ वानखडे, व निमखेड येथील संरपंच विपिनभाऊ अनोकार, व बुद्धवण नियोजन समितीचे सदस्य कीरणभाऊ वानखडे, विजय दामले, सहील कव्वाल, तसेच साप्ताहिक दर्यापुर दर्पनचे पत्रकार संघरत्न सरदार यांच्या उपस्थित टूस्टच्या स्वाधिन सोपवण्यात आले असुन. डॉ. डोंगरे साहेबांचे खुप खुप अभिनंदन व आभार समेतीच्या वतीने करण्यात आले.