पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- वानवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ५४४ / २०२३ भा.दं.वि कलम ३९७, ३४१, ३४, आर्म अॅक्ट ३(२५),२७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी मदनलाल ओसवाल व त्यांचा मुलगा प्रतिक औसपाल यांचे सय्यदनगर हडपसर पुणे येथे नाकोड़ा ज्वेलर्स नावाने दुकान आहे. दि. ०८/११/२०२३ रोजी रात्री त्यांचे दुकान बंद करून, तं दोघेही त्यांचेकडील बँगेत कामासाठी आलेले दोन तोळे सोन्याचे दागीने आणि रोख रक्कम १०,०००/-रुपये हे घेवून त्यांचे मुंडवा येथील राहते घरी जात असताना, जयसिंग ससाणे उद्यान, बी.टी. कपडे रोडवर या ठिकाणी एका काळे रंगाचे मोटारसायकलवरून तीन अनोळखी इसम आले. त्यांनी फिर्यादी व त्यांचे मुलाचे गाडीस त्यांची गाडी आइवी लावून थांबविले. फिर्यादी यांचे मुलाचे हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिक याने विरोध केला. त्यावेळी सदरचे तीन इसमांपैकी एकाने त्याचेकडील गावठी पिस्टलने प्रतिक ओसवाल याचे दोन्ही पायावर व गालावर फायर करुन त्यांना गंभीररित्या जखमी करुन त्यांचेकडील दागिने व पैशाची बॅग हिसकावून घेवुन पोबारा केला. प्रतिक ओसवाल यांचेचर इनामदार हॉस्पीटल येथे उपचार सुरु आहेत.
गुन्हा दाखल झालेनंतर वानवडी पोलीस ठाणेचे तपासपथक, तपासी अधिकारी तसेच गुन्हेशाखा युनिट ५ चे अधिकारी कर्मचारी यांनी तांत्रीक पध्दतीने तसेच रेखाचित्राचे आधारे तपास सुरु केला. तपास करत असतेवेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय पंतगे यांना गुन्हयातील आरोपी हे घटना घडल्यानंतर दिल्ली येथे गेले पळून गेले असल्याची पक्की खबर मिळाली. त्याप्रमाणे मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख आदेश च मार्गदर्शनानुसार तत्काळ पुढील उपाययोजना करण्यात आल्या. वानवडी पोलीस ठाणेचे तपासपथक अधिकारी पोउपनि श्री संतोष सोनवणे, पोशि/ संदिप साळवे, पोशि/ विष्णु सुतार पोहचा / संतोश नाईक यांचे पथक दिल्ली येथे रवाना झाले व त्यांनी तांत्रिक विश्लेषन व स्थानिक पोलीसांच्या मदतीने दाखल गुन्हयातील तीन आरोपी नामे १) बिलाल अहमद असदअली त्यागी, वय ३४ वर्षे, रा. फ्लॅट नं. १०२, डी / ३६, गल्ली नं. १०, रिशिकरदन मार्ग, सिलमपुर, उत्तर पूर्व दिल्ली, दिल्ली ११००५३ मुळ पत्ता – पुराणी घासमंडी, हंडीया मुहल्ला, घर नं. २१४, सीवीलाईन पोलीस ठाणे, मुजफ्फरनगर, उत्तरप्रदेश, २) हनी जीते वाल्मिकी, पय २६ वर्षे, धंदा. काहीनाही, रा बी-१७८, आंबेडकर बरती, आर के पुरम सेक्टर-१, साऊथ वेस्ट दिल्ली, दिल्ली ११००२२ व ३) सागर राज कुमार, वय २६ वर्षे, धंदा. शेती, रा. घर नं. ११०, बाल्मीकी मुहल्ला, राणापाना, कुतबगड, नॉर्थ पेस्ट दिल्ली, दिल्ली ११००३९ यांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करुन आजरोजी मा. न्यायालयात हजर केले असता, दि. २०/११/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केलेली आहे. आरोपीतांनी वापरलेले हत्यार, वाहन व प्रतिक ओसवाल यांचेकडुन हिसकावून नेलेली बॅग प त्यातील ऐवज हस्तगत करण्यासाठी पुढील तपास सुरु आहे. दरम्यान युनिट ५ चे अधिकारी पोनि महेश बोळकोटगी यांना व त्यांचे पथकास गुन्हयातील वाहन हे चोरीचे असल्याचे खात्रीलायक माहीती मिळाल्याने व आरोपी बिलाल त्यागी याने त्याचा साथीदार सर्फराज हनिफ शेख वय २३ वर्षे रा. रामटेकडी पुणे याचे मदतीने स्पलेंडर दुचाकी घटनेच्या अगोदर चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास आज रोजी अटकेची कार्यवाही करण्यात येत आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि.-५, पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे, पोलीस निरिक्षक गुन्हे विनय पाटणकर व तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक संतोष सोनवणे, पो.अम. अजय कैसरकर, अमजद पठाण, संतोष नाईक, अतुल गायकवाड, हरिदास कदम, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, निलकंठ राठोड, यतीन भोसले, राहुल माने, विठ्ठल चोरमले, अमोल गायकवाड व सोनम भगत तसेच गुन्हेशाखा युनिट -५, चे पो.नि. महेश बोळकोटगी व त्यांचे पथकाने केली आहे.