🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत नराधम युवकाने मतिमंद युवतीवर बळजबरी अत्याचार केला. ही धक्कादायक घटना पोरगव्हाण गावात घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी आष्टी पोलिसांंनी आरोपी नराधमास ५ रोजी रात्री उशिरा अटक केल्याची माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे यांनी दिली. पोलिसांनी अटक केलेल्या नराधमाचे नाव अतुल सुरेश बोरीवार वय 25 वर्ष असे आहे.
25 वर्षीय गतिमंद तरुणीचे आई-वडिल शेतात मजुरी काम करण्यास गेले होते. पीडितेचा भाऊ आणि पीडिता हे दोघेच घरी होते. पीडितेचा भाऊ जेवण करुन घरासमोरीलच चौकात मित्रांसोबत गप्पा करण्यासाठी गेला होता. काही वेळाने पीडितेचा भाऊ घरी गेला असता पीडिता ही नग्न अवस्थेत दिसून आली. तसेच आरोपी नराधम अतुल हा देखील तेथे दिसून आला. पीडितेच्या भावाला पाहून आरोपीने तेथून पळ काढला. पीडितेच्या भावाने याबाबतची तक्रार आष्टी पोलिसात दिली. पोलिसांनी 5 रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी अतुल सुरेश बोरीवार याला अटक केल्याची माहिती दिली.