पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- भाऊबीजेसाठी बहिणीला भेटायला निघालेल्या एका युवकाच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी आंबेगाव पठार येथे घडली. या युवकाच्या दुचाकी मोटर सायकलला भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली त्यात त्याचा मृत्यू झाला. पंकज मनोहर पायगुडे वय 29, रा. धायरी फाटा असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
मृतक पंकज मनोहर पायगुडे हा युवक भाऊ बिजेला आपल्या बहिणीला भेटायला जात होता त्यात अपघातात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंकजच्या भावाने तन्मय मनोहर पायगुडे वय 26, रा. धायरी फाटा याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डंपर चालक हिमांशू मोहनलाल चोप्रा वय 36, वडगावशेरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊबीजेनिमित्त पंकज हा आपल्या बहिणीला भेटायला कात्रज येथे जात होता. नवले पुलाजवळील महालक्ष्मी ग्रेनाईड दुकानासमोर भरधाव वेगाने डंपर आला आणि त्याने पाठीमागून पंकजच्या दुचकीला धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की त्यात पंकजचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती परिसरात कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.