पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- यातील फिर्यादी हे दि. १४/१०/२०२३ रोजी दुपारी सिंहगड रोड, वडगाव ब्रिज, पुणे येथे त्यांची कार घेवुन वडगाव ब्रिज, सिंहगड रोड, पुणे येथे प्रवासी वाहतुक करणेकरीता थांबले असताना, इसम नामे १) सुनिल लक्ष्मण गवळी, व 1, वय अंदाजे ४० रा . धनंजय वस्ती, श्रावणधारा वसाहत, सर्व्हिस ज्ञान कॉलनी, कोथरुड, पुणे २) शरद मोहन पंडीत, वय अंदाजे ३८ रा. मु.पो. दहीकंद, ता. गेवराई, जि.बिड, सद्या रा. मानस सरोवर, धायरी, ता. हवेली, जि.पुणे या दोघांनी डि.जे ट्रॅव्हल्स या अॅपवर भाडेतत्वावर मोटार कारची मागणी केली म्हणुन फिर्यादी हे त्यांची कार घेवुन गेले असताना वरील दोन्ही इसमांनी त्यांना वडगाव -ब्रिज ते डेक्कन, जंगली महाराज रोड यामार्गे सासवड येथे कार मधुन पळवून नेवून, त्यांच्याकडे १०,०००/- रूची खंडणी मागितली आणि पैसे दिले नाहीतर तुझे बरेवाईट करून टाकू अशी धमकी देवुन जबरदस्तीने त्यांना १०,०००/- रुपये देण्यास भाग पाडले. तसेच त्यांना लाथा-बुक्क्यांनी व उसाच्या कांडयांनी शरीरावर ठिकठिकाणी मारहाण करून त्यांचेकडे असलेल्या धारदार शस्त्राचा धाक दाखवुन जबरदस्तीने त्यांना मागितल्याप्रमाणे पैसे दयावेत म्हणुन त्यांना टेंभुर्णी येथील एका पेट्रोल पंपावरून कार्डव्दारे रोख रक्कम ९,८००/- रू काढून देण्यास प्रवृत्त केले. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५०७/२०२३.भा.दं.वि. कलम ३६४ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४, मपोकाक. ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याचा तपासा दरम्यान आरोपी नागे सुनिल गवळी ( टोळी प्रमुख) याने त्याचा साथीदार शरद पंडीत (टोळी सदस्य) यांचेसह स्वतःचे तसेच टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे व अवैध मार्गाने इतर फायदा व्हावा म्हणुन जबरी चोरी करणे, घर फोडी करून पैसे मिळवणे, अपहरण करणे, शस्त्र बाळगणे अश्याप्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत असतो. तसेच त्याने पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये दहशत निर्माण व्हावी व आर्थिक फायदा व्हावा यासाठी आपल्या संघटीत टोळीच्या वतीने एकटयाने व टोळीतील सदस्यांनी संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करुन, धमकी देवून, धाकदपटशा करुन, जुलुम जबरदस्ती करुन दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे केलेले आहेत. तसेच नमुद टोळी प्रमुख यास पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दि.०२ / १२ / २०२१ रोजीपासुन ०१ वर्षाकरिता स्थानबध्द करुन देखील त्याचे गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध झाला नाही, त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
नमुद गुन्हयाच्या तपासा दरम्यान टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे टोळीचे फायदयासाठी प्रस्तुत गुन्हा केला असल्याचे दिसुन आलेने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii)३ (२), ३(४) चा अंतर्भावः होण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अभय महाजन यांनी पोलीस उप आयुक्त परि ३ पुणे श्री सुहेल शर्मा यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रकरणाची छाननी करून सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ५०७/२०२३ नादंवि कलम ३६४ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४, मपोकाक ३७ (१) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्हयारा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२) ३(४) चा अंतर्भाव करण्याची अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग पुणे श्री अप्पासाहेब शेवाळे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि ३, पुणे, श्री. सुहेल शर्मा, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग, पुणे श्री. अप्पासाहेब शेवाळे यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. जयंत राजुरकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि सचिन निकम यांचेसह सर्व्हेलन्स पथकाचे पो.उप निरी. गणेश मोकाशी, पोलीस अंमलदार स्मित चव्हाण, प्रथमेश गुरव यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन, शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकां मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार याना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ८५ वी कारवाई आहे.