मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र
संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनाक 27 जून 2023 रोजी पहाटे 3.30 वाजता सुमारास हिंगणघाट शहरातील मोहता चौक परिसरात पंकज कोचर यांचे कोचर कृषी केंद्र या दुकानाचे सेटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश करून दुकानात ठेऊन असले नगदी 10,3000 रू चोरट्यांनी चोरून नेला होता. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानात चोरी झाल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली होती.
या चोरीचा तपास सुरू असताना पोलिसाना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरून हिंगणघाट डीबी पथकाचे पोलीस अमलदार यांनी बाहेर राज्यातील आरोपी 1) वेकतेश गोडा रहाणार विजयवाडा आंध्र प्रदेश 2) रमेश बाबु मुततुराम कविलपेटी आंध्र प्रदेश 3) रंजीत रजनकुमार रा. तामिळनाडू राज्य केरळ यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारणा केली असता सदर गुन्हा त्यांनी केल्याचे कबूल केल्याने त्यांचे ताब्यातून नगदी 10300 रू व चोरी करना चाहती उपयोगी असलेले साहित्य जप्त करून गुन्ह्यात आरोपी त्यांना अटक करण्यात आली. वरील चोरट्यांनी बल्लारशा, आंध्रप्रदेश राज्य या ठिकाणी सुद्धा चोरीचे गुन्हे केल्याची पोलिसांना माहिती दिली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मिलिंद मुळूक ठाणेदार हिंगणघाट याचे निर्देशाप्रमाणे psi रमेश मिश्रा डी. बि. पथकाचे, पोहवा सुमेध आगलावे, प्रवीण बोधाने, अजहर खान, राहुल साठे पो. काँ. आशिष नेवारे, अमोल तिजारे यांनी केली
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348