मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- छतीसगड राज्यातील जगदालपूर येथून मनोज या नावाचे मुलगा त्यांचे वय 13 यांनी रस्ते भटकून सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका गावात आला होता. रस्त्यावर आपल्या गाव कुठे आहे; जायचा कसे; कुटुंबियांच्या आठवण करून रस्त्यावर रडत असताना पेंटीपाका गावातील ग्रामस्थांनी सिरोंचा तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे मूलकला फाउंडेशन टीमला याबाबत माहिती दिली.
यावेळी समय सूचकता दाखवत त्वरित मूलकला फाउंडेशनचे अध्यक्ष सागर मूलकला यांनी पेंटीपाका येथे पोहचून त्या मुलांचे कुटुंबियांचे माहिती घेऊन मुलांच्या कुटुंबियांना संपर्क साधला आणि या मुलाविषयी माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली.
आपल्या मुलाची माहिती मिळतातच दुसऱ्या दिवशी सकाळी छतीसगड राज्यातील जगदालपूर मधून रस्ते भटकून सिरोंचात आलेल्या मुलाला कुटुंबियांना सोपविण्यात आले. यावेळी मूलकला फाउंडेशनचे अध्यक्ष सागर मूलकला यांनी या मुलाला आर्थिक मदत देखील केली. यावेळी या मुलाच्या कुटुंबीयांनी मूलकला फाउंडेशनचे आभार मानले.
त्यावेळी मूलकला फाउंडेशनचे कार्यकर्ते – राजकुमार मूलकला, कल्याण मूलकला, सलमान शेख सह अनेक गावकरी व मित्र परिवार उपस्थित होते.