पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
दिघी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दिघी पोलीस ठाणे मधील रामदास मुकणे पो.हा.ब.नं. ९११ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहित मिळाली की, एक इसम चोरीची मोटार सायकल दाभाडे सरकार चौकाचे पुढे चहोली बायपास रोड, चहोली बु//, ता. हवेली, जि. पुणे याठिकाणी घेवून येणार आहे, अशी माहिती मिळताच त्यांनी त्याबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो., दिघी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी भंडारे, पो हवा ९११ मुकणे, पो हवा ७१३ फलके, पो हवा ९५३ विंचू, पो हवा १०२० कांबळे, पो हवा ८०१ पोटे यांनी सापळा लावुन इसम नामे मनोज मेहतर सोंदरकर, वय ४० वर्षे, व्यवसाय-बिगारी, रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे यास त्याचेकडील ड्रीम युगा नो/ सायकल सह ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील मो/ सायकल ही दिघी पोलीस ठाणे गु. रजि नं. १९०/२०२२ भा. द. वि कलम ३७९ यातील चोरीस गेलेली मो/ सायकल असुन आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने सदरची गाडी बाबा मिस्त्री याचेकडुन विकत घेतल्याचे समजले आरोपीच्या मो/नंबरचे तांत्रिक विश्लेशन करुन इसम नामे नासिर ऊर्फ बाबा मिस्त्री शमशुद्दीन शेख, वय ३६ वर्षे, रा पगडेवस्ती, मराठी शाळेजवळ, चन्होली खु// ता हवेली जि पुणे यास पगडे वस्ती आळंदी येथुन ताब्यात घेवुन त्यास नमुद गुन्हयात अटक करुन त्याचेकडे तपास केला असता आरोपीकडे खालील एकण ०६ मो/सायकल मिळुन आल्या असुन त्या जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरच्या कारवाईत एकुण ३,५५,०००/- रुपये किमतीच्या ०७ मोटारसायकल जप्त करुन सात गुन्हे उघड करण्यात आले असुन गुन्हयातील आरोपी १) नासिर ऊर्फ बाबा मिस्त्री शमशुद्दीन शेख, वय ३६ वर्षे, रा पगडेवस्ती, मराठी शाळेजवळ, चन्होली खु// ता हवेली जि पुणे २) मनोज मेहतर सोंदरकर, वय ४० वर्षे व्यवसाय-बिगारी, रा.मरकळ, ता. खेड, जि. पुणे यांना अटक करण्यात आली असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. सदर गुन्हयाचा तपास चालु आहे.
सदरची कारवाई श्री. संदिप डोईफोडे मा पोलीस उपायुक्त, परीमंडळ ०३, श्री. विवेक मुगळीकर मा. सहायक पोलीस आयुक्त, भोसरी एमआयडीसी विभाग, श्री. मच्छिद्र पंडित वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दिघी पोलीस ठाणे, श्री दशरथ वाघमोडे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मागदर्शनाखाली दिघी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी पोउपनी आर. बी. भंडारे, पोउपनि एस.एम. भदाणे व अंमलदार पोहा ७१३ फलके, पोहा ८०१ पोटे, पोहा ९५३ बिंचु, पोहा ९११ मुकणे, पोडा १०२० कांबळे, पोहा ११६८ जाधव, पोहा १५७२ जाधव, पोशि २०९४ जाधव, पोशि ३५५३ कसबे व पोशि ३३९१ भोसले यांनी केली आहे.

