हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- भिक्षु निवास पाली विद्यालय बुध्द विहार समिती, विद्यानगर, बल्लारपूर व्दारा स्मृतीशेष भदंत प्रज्ञापाल (महाथेरो) यांचा अठरावा स्मृतीदिन कार्यक्रम २५ नोव्हेंबर ला भिक्षु निवास पाली विद्यालय, बुध्द विहारासमोरील पटांगणावर बल्लारपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी ८.०० वाजता स्मृतीशेष भदंत प्रज्ञापाल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व अभिवादन त्यानंतर सामुहिक वंदना, सकाळी ११.०० वाजता भिक्षु संघाचे सामुहिक भोजन दान तर सायंकाळी ७.०० वाजता धम्मदेसना होणार आहे. त्यात डॉ. भदंत धम्मसेवक महाथेरो (पि.एच.डी) नागपुर, भंते बोधीपालो खंती साकोली, जि. भंडारा, भंते आनंद साकोली, जिल्हा भंडारा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.