अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- 65 व्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद उस्मानाबाद तालीम संघ व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिवच्या वतीने कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब 2023 -24 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कुस्ती स्पर्धा ही शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या स्पर्धेत 36 जिल्ह्यातून कुस्तीपटू सामील झाले होते. वर्धा जिल्ह्यातून बल भीम व्यायाम शाळेचे कुस्तीपटू शंकेश पाटील, शिवम जाधव ऋषिकेश बोधाणे, अंश श्रीवास, रुषभ रोकडे, सुमित भुते (महाराष्ट्र पोलीस मुंबई) वेदांत चव्हाण, पियुष शेटे त्यांच्यासोबत मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, वर्धा जिल्हा संलग्न, वर्धा जिल्हा – सचिव पहेलवान सम्राट भुजंगराव कांबळे तसेच वर्धा जिल्हा कुस्ती प्रशिक्षक नवनाथ भुसणार व बल भीम व्यायाम शाळेचे प्रशिक्षक गजुभाऊ जाधव हे उपस्थित होते.
शंकेश पाटील हे 61 किलो ग्रॅम या वजन गटात व शिवम जाधव 57 किलो ग्रॅम या वजन गटात सहभागी होऊन त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे समता सैनिक दलाच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी रमेशजी डांगे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बलभीम व्यायाम शाळा प्रशिक्षक गजूभाऊ जाधव, पुंडलिकजी गाडगे, दिगंबरजी लांबे हे उपस्थित होते. त्यांना रमेश डांगे व पुडलीकजी गाडगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी पहलवान गजुभाऊ जाधव, पहलवान मारोतराव डंभारे, समता सैनिक दल वर्धा जिल्हा संघटक अभय कुभारे यांचे आभार मानले व त्यांचे रमेश डांगे, दिगंबर लांबे, मारोतराव डंभारे, पुंडलीक गाडगे, प्रदीपभाऊ कांबळे, मनोज थुल, गजुभाऊ जाधव, अमित डांगे, दिपक डांगे, शैलेश सुटे, अतुल मेश्राम, सिद्धार्थ मुन, दीपक मेंढे, गंपूभाऊ ठाकरे, चंदू भगत, अमोल ताकसांडे, रोशन कांबळे, आशिष पाटील आदिंनी अभिनंदन केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348