प्रशांत जगताप संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संविधान दिनानिमित्त गंगाई बहुउद्देशिय संस्था हिंगणघाट, जि. वर्धा मार्फत राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानात नमूद असलेले मूलभूत अधिकार व्यक्तीचा आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास करून त्यांच्या न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची जोपासना करणे तसेच मूलभूत अधिकार बहाल करणे हा उद्देश आहे. या उद्देशाचे महत्व समाजातील जनतेला, महिला व मुलांना समजाविण्या करिता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात खालील विषयांवर तज्ञ मंडळींकडून मार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
1.स्त्री पुरुष समानता 2.भुखमरी 3.आरोग्याविषयी मार्गदर्शन 4.शिक्षणाचे महत्व 5. बेरोजगारी निर्मुलन 6. कौटुंबिक हिंसाचार कायदा संस्थेच्या वतीने संस्था उपाध्यक्ष मंगला लोखंडे यांनी त्यांच्या पाड्यावरील सामाजिक कार्यकर्ते अजय कुमार ह्यांच्या साह्याने त्यांच्या भाषेत समजावून सांगितले.
स्त्री पुरूष समानता प्रस्थापित केली तर घरगुती समस्या किंवा हिंसाचार कमी होईल, मन निरोगी राहील तसेच कामात लक्ष लागून दरडोई उत्पन्न निश्चितच वाढेल. त्यामुळे चांगले खान पान करून आरोग्यही सुधारेल, तसेच जीवनमान उंचावण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढेल. या सर्व बाबी एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे सर्वांनी स्वतःमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे महत्वाचे मार्गदर्शन मंगला लोखंडे यांनी केले. समाजसेवक अजय कुमार, ज्वाला सदमके, शारदा भगत, रीमा मडावी, ललिता मडावी यांनी सहकार्य केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 7385445348 / 9766445348