मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील भिवापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गांगापूर मधील रहिवासी गेल्या पंचवीस वर्षा पासून १२५ कूटूंब राहत असून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. वार्ड नंबर दोन मधील नागरिक त्रस्त आहे.अशा विविध मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन यांनी अनेकदा निवेदन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना निवेदन 2023 मध्ये निवेदन दिले.
मागच्या वर्षी 2022 मध्ये हिंगणघाट येथील आमदार समीर कुणावर यांना मागल्या वर्षी ठरावाची प्रत व निवेदन देण्यात आले होते. परंतु निवेदनाला सगळ्या जनप्रतिनिधींनी केराची टोपली दाखवली. या जनप्रतिनिधींना सद्बुद्धी येण्यासाठी व गावातील झालेली दुरावस्था यासाठी सामाजिक कार्यकर्ते सचीन महाजन यांनी बजरंग बली समोर साकडे घातले. दोन फुटाचा खोल मोठा खड्डा पडला आहे, तरी गावात शासन प्रशासकीय कोणी पाहण्यासाठी आले नाही, जिल्हा परीषद सदस्य यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला गंगापूर गावा मध्ये सरपंच ग्रामसेवक यांचे गावाकडे दुर्लक्ष झाले असून गावातील नागरिकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस अतुल वांदिले यांना जनसंवाद यात्रेदरम्यान सांगितल्या व त्यांनी गावात भेट देऊन रस्ताची पाहणी करून समस्या जाऊन घेतली, गावात रस्ता नाही अजून आम्हाला पट्टे नाही घरकुल सुद्धा नाही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अतुल वादीले यांनी गावातील समस्या लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले.
आमदार समीर कूणावार यांनी सचीन महाजन यांना फोन करून म्हटले की अजूनपर्यंत माझ्याकडे एकही निवेदन पोहचले नाही गावातील समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या अशी मागणी गावातील नागरिक सचिन महाजन, विजय शेंडे, रमेश कुडमते, दशरथ अंडरर्सकर, पांडू भोयर गजानन राऊत, हरिदास बरडे, विट्टल क्षीरसागर, भास्कर मोरे, विट्टल जुमनाके, बनडुजी भोयर प्रतीक भोयर, विलास पोहनकर, भाऊराव म्हरसकोले यांनी केली आहे.
प्रतिक्रिया:-मी अनेकदा आमदार समीर कूणावार यांना निवेदन दिले आहे पण ते म्हणतात की मला निवेदन मिळाले नाही मग मी दिलेले निवेदन गेले कूठे सामाजिक कार्यकर्ते: सचीन महाजन