Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

शालेय विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहारा धान्याचा काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील धान्यचोरांच्या पोलिसांनी केला भांडाफोड.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 2, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
शालेय विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहारा धान्याचा काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील धान्यचोरांच्या पोलिसांनी केला भांडाफोड.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात मोठ्या प्रमाणात धान्याचा काळाबाजार सुरू आहे. त्यात शासन मार्फत मिळालेले स्वस्त धान्य अशो की शालेय विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहारा सर्वत्र धान्याचा काळाबाजार सुरू आहे. या काळाबाजार पोलिसांनी भांडाफोड केल्याने एकच खळबळ माजली आहे.

सेवाग्राम पोलिसांनी गुरुवारी पोषण आहारा धान्याचा काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील धान्यचोरांच्या भांडाफोड केला. MH 29 AT 1102 क्रमांकाचा वाहनचालक विनोद भांगे यास वाहनासह ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या वाहनात अवैधरीत्या 25 क्विंटल तांदूळ आढळून आला. यावेळी पोलिसांनी तांदूळ बाबत विचारणा केली तर उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी आपल्या खाख्या दाखवताच त्याने सदर तांदूळ एमआयडीसी परिसरातील किशोर तापडीया यांच्या एक गोडाऊनमधून खरेदी केल्याचे सांगितले. तसेच सदर तांदूळ सांवगी(मेघे) येथील धान्य शेख रहीम शेख करीम याला विकणार असल्याची माहिती पोलिसांना दिली.

आरोपी किशोर तापडीया हा जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूरवठा करणाऱ्या तांदळाचा काळाबाजार करीत असल्याची माहिती आधीच शिक्षण विभागाला होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केलेल्या घटनास्थळी शिक्षणाधिकारी जगताप दोन पंचाना घेऊन तापडीया ह्याच्या सेवाग्राम येथील गोडाऊनवर पोहचले. याठिकाणी आधीच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे व पोलीस उपनिरीक्षक राहुल इटेकर आपल्या ताफ्यासह हजर होते.

यावेळी गोडाऊनच्या आत जप्त केलेल्या तांदळा सह एफसीआयचे सील लागलेल्या व पोत्यांवर “राज्य सरकारी विपणन संघ मर्यादित” अशा आशयाचे ५० किलो वजनाचे तांदूळ भरलेले पोते मोठ्या प्रमाणात आढळून आले. यासोबतच एफसीआयच्या प्रिंट असलेली रिकामी पोती, मटकी, खाद्य तेल, मिरची पावडर, हळद तसेच मालाची उचल केल्या संबंधित सगळे दस्तऐवज आढळून आले.

या दरम्यान पोलिसांनी किशोर तापडीया याची झाडाझडती घेतली असता त्याने वर्धा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शालेय पोषण आहारातील धान्याचा पूरवठा करण्याचे कंत्राट मुर्तिजापूर येथील अंकीत सतिश अग्रवाल यांच्याकडे असून मी पेटी कंत्राट घेतल्याचे सांगितले. यासंबंधी परवान्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असता सब गोलमाल आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत वाहनासह 8 लाख 69 हजार 810 रुपयांचा धान्यसाठा जप्त केला.

बनावट दस्तऐवजांच्या आधारावर शाळकरी विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिसकावणाऱ्या सदर टोळीचा पर्दाफाश सेवाग्राम पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे व शिक्षणाधिकारी जगताप यांनी मिळून केला असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे करीत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहारा धान्याचा काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील धान्यचोरांच्या पोलिसांनी केला भांडाफोड याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांत धान्यचोरांवर जिवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर नारायण तापडीया वय 46 वर्ष रा. एसटी डेपोजवळ, रामनगर, विनोद बबन भांगे वय 40 वर्ष रा. बोरगांव (मेघे), शेख रहीम शेख करीम वय 46 वर्ष रा. स्वस्तिक नगर, सावंगी (मेघे), अंकीत सतिश अग्रवाल रा. मुर्तिजापूर, अकोला यांच्यासह इतरांवर कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या तक्रारीहून सदरची कारवाई करण्यात आली.

Previous Post

6 डिसेंबर रोजी बाबासाहेब बरोबर जवळ असलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांचे स्मारकाला अभिवादन करण्याचे आव्हान.

Next Post

मेहकर जामगाव लेआऊट मध्ये ग्रीन झोन प्रतिबंध असुन लेआऊट रोड व लाईन डेव्हलपमेंट नसुन त्या लोकांची फसवणूक व दिशाभुल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मेहकर जामगाव लेआऊट मध्ये ग्रीन झोन प्रतिबंध असुन लेआऊट रोड व लाईन डेव्हलपमेंट नसुन त्या लोकांची फसवणूक व दिशाभुल.

मेहकर जामगाव लेआऊट मध्ये ग्रीन झोन प्रतिबंध असुन लेआऊट रोड व लाईन डेव्हलपमेंट नसुन त्या लोकांची फसवणूक व दिशाभुल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In