मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- देशातील महत्त्वपूर्ण ४ राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांमध्ये महत्वपूर्ण असलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ह्या ३ राज्यात भाजपाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला असून तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टीचा आलेख ही वाढलेला आहे. या दणदणीत विजयाचा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील मुख्य चौक असलेल्या कै. राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात काल जल्लोष साजरा करण्यात आला, ह्यावेळी गगनभेदी फटाके फोडून आणि पेढे वाटून हा दणदणीत विजय साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या, ह्या प्रसंगी “राजे अम्ब्रीशराव आत्राम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” ” भारतीय जनता पार्टीचा विजय असो” इत्यादी नाऱ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून गेले होते, ह्यावेळी भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

