उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- दि. 03 डिसेंबर रोजी निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्याचे सदस्य अतुल साहेबराव भांगे यांच्या आजी स्व.कौशल्याबाई पांडुरंग भांगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य रक्तदान शिबिर साई जीवन रक्तपेढी येथे मोठ्या संख्येने पार पडले. या रक्तदान शिबिरामध्ये 25 रक्तदात्यांनी रक्तदान करून गरीब, गरजू व थॅलेसिमिया ग्रस्त या रुग्णांना जीवनदान दिले.
या रक्तदान शिबिरात 23 पुरुष व 2 महिलांनी रक्तदान करून महिलांनी समाजाला एक संदेश दिला की महिलांपण पुरुषांपेक्षा कमी नाही हा संदेश रक्तदान शिबिरामध्ये दिला. या रक्तदान शिबिराला उपस्थिती श्री.साहेबरावजी भांगे, श्री.विठ्ठलरावजी भांगे, श्री.रमेश पाटणकर, दिनेश हिवराळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संतोष अवचार, अजय शेगोकार, सत्यप्रकाश आर्या, सौ.सोनाली अग्रवाल, सौ.पूजा मालोकार, समाजसेवक श्री.उमेश इंगळे, माधव काळे, आकाश राठोड, मयूर परंडे, मोहित अव्हाळे, अक्षय घाटे, अविनाश बोंडे, श्रीकांत पाचबोले, आकाश वानखडे, अक्षय खराटे, किरण श्रीनाथ, विकी डोंगरे, आनंद भिसे, यश गिरे, पंकज भुजाळे, अक्षय वाडकर, नितीन उपराटे, गणेश पायघण, राम गालट, सागर डाबेराव, कुंदन गिरी, श्रीकांत भाऊ, प्रतिक निंबोकार, सपना मगर, धनश्री राठोड, भूषण शिंदे पाटील, संतोष पहुरकर, साई जीवन रक्तपेढी सर्व टीम व निस्वार्थ रूणसेवा परिवारातील सदस्य-सदस्यिका व शाखा पदाधिकारी, शिक्षक वृंद, महिला मंडळ व मित्रपरिवार या सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन मोठा प्रतिसाद दिला.
यावेळी समाजसेविका श्वेताताई यांचा निस्वार्थ रूग्णसेवा परिवार या परिवारातील सदस्यांनी ताईंचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला व शिबिराचे आभार प्रदर्शन अतुल भांगे यांनी केले.