पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दि. ०४/१२/२०२३ रोजी कोंढवा पोलीस ठाणेच्या हद्दीतील पारशी मैदान येथे इसम नामे शहानवाज उर्फ बबलु मुनीर सय्यद, वय ५५ वर्षे रा. ताहिर हाईट्स, भाग्योदयनगर, कोंढवा पुणे यांचा पोटात गळ्यावर धारधार हत्याराने भोकसुन वार करून अज्ञात इसमाने खुन करण्यात आला होता. खुन करणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेवून ताब्यात घेण्याबाबतच्या सुचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिल्या होत्या. अज्ञात इसमाचा शोध घेण्याकामी कोंढवा पोलीस ठाणेकडील दोन पथके रवाना करण्यात आली होती. सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे व त्याचे तपास पथक अज्ञात आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विकास मरगळे व जयदेव भोसले यांना त्याच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती की, पिसोळी भागातील एका बंद बिल्डींगमध्ये एक इसम काल रात्री पासुन घाबरलेला अवस्थेत थांबुन असुन त्याने काही गुन्हा केला असल्याची शक्यता आहे. तेव्हा सदर ठिकाणी तपास पथकातील अंमलदारासह रवाना होवुन पिसोळी भागातील धमार्थत पेट्रोल पंपाच्या मागिल बाजुस असणाऱ्या बिल्डींगमध्ये एक इसम टेरेसवर लपुन थांबल्याचे दिसले. तेव्हा त्यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पत्ता नुमन जावेद खान, वय २६ वर्षे, रा. किंग स्टन इलेसिया सोसायटी, अॅथॉनिनगर, पिसोळी पुणे असे असल्याचे सांगितले. तेव्हा सदर इसमास ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने त्याचे साथीदारासह आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणावरुन खुनाचा कट करुन शहानवाज उर्फ बबलु मुनीर सय्यद यास पारशी मैदान येथे सद्दाम शेख, साहिल शेख याच्यासह घेवुन जावुन त्यास दारु पाजुन त्यानंतर त्याचा सर्वानी मिळुन चाकु सारख्या हत्याराचा वापर करून पोटात गळ्यावर धारधार हत्याराने भोकसुन वार करुन खुन केल्याची कबुली आहे. खुन करण्याच्या कारणाबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने शहानवाज उर्फ बबलु मुनीर सय्यद याचा बँकेकडुन घेतलेल्या क्रेडिट कार्डचे आर्थिक देवाण घेवाणी वरुन त्याच्यात दोन तीन तीन दिवसापुर्वी वाद झाले होते त्यावेळी शहानवाज उर्फ बबलु मुनीर सय्यद याने आरोपी यांना शिवीगाळ केली होती त्याच्या कारणावरुन चिडुन दोन दिवसापासुन खुन करण्याचे प्लॅनिंग करुन काल दि.०३/१२/२०२३ रोजी पारशी मैदान येथे घेवुन जावुन खुन केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी यास अटक करण्यात आली असुन शहानवाज उर्फ बबलु मुनीर सय्यद याच्या खुनाबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले हे करित आहेत. तसेच सदर पाहिजे आरोपी सद्दाम शेख, साहिल शेख याला गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर चे पोलीस निरीक्षक महेश बालकोटगी व त्याचे पथकाने ताब्यात घेतले आहे..
वरिलप्रमाणे कामगिरी मा. रितेशकुमार साो पोलीस आयुक्त, मा.रंजन शर्मा सो अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मा. विक्रांत देखमुख, पोलीस उप आयुक्त सो परि.०५ मा. शाहुराव साळवे, सहा.पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संदिप भोसले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, पो.हवा. २८३ अमोल हिरवे, पो.शि.८६४६ जयदेव भोसले, पो.शि. ९१२६ विकास मरगळे, भो हवा ७९ निलेश देसाई, पो.शि. १०११४ सुहास मोरे, पो.शि. १००२६ राहुल थोरात, पो.शि.८२९८ अभिजीत रत्नपारखी, पो.शि.८७५१ शशांक खाडे, पो.शि. ८५०४ आशिष गरुड, पो. हवा. ६९४६ राहुल वंजारी, पो. शि. ५७८ रोहित पाटील यांनी केली आहे.

