रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- केंद्रीय मंत्री नारायण राणे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर एकेरी भाषेत टीका टिपणी केल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वर गुन्हा दाखल करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी वतीने मंठा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मागच्या काही दिवसा पूर्वी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी ऐकरी भाषेत टीका टिपणी केल्याबद्दल बहुजनाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. नारायण राणे यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करण्यात येऊन त्यांच्या वर मानहानी चा गुन्हा दाखल करण्यात यावा नसता येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी मंठा तालुक्याच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी काही उद्रेक झाल्यास यासाठी शासन व प्रशासन जबाबदार राहील तसेच नारायण राणे यांचा वंचित बहुजन आघाडी मंठा तालुक्याच्या वतीने तीव्र शब्दा मध्ये जाहीर निषेद करण्यात येत आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी जिल्हा महासचिव डॉ. किशोर त्रिभुवन जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे परतूर तालुका अध्यक्ष रवींद्र भदर्गे मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष अध्यक्ष गौतम अंभोरे, अयुब सय्यद, महासचिव संजय वागजामारे, दिनकर जावळे, महेंद्र जाधव अर्जुन वाकले, राहुल धाकरगे, इंद्रकांत मगर, बाळू मगर, रामेश्वर कांबळे, लक्ष्मण वाघमारे, संदीप मगर, बापूराव जाधव, सहदेव जाधव, सुनील कामिटे, रमेश प्रधान, बबन अंभोरे, गौतम बनसोडे, सुनील बनसोडे, गजानन सिल्लोड आदींची उपस्थिती होती.

