रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार सर्वांना समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव घटनेच्या माध्यमातून बहाल करणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त परतुर रेल्वे स्टेशन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले आज सकाळी 11 वाजता रेल्वे कर्मचारी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी महामानवाला अभिवादन केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रवींद्र भदर्गे, शहराध्यक्ष राहुल नाटकर सीनियर बुकिंग क्लर्क संजय गाडगे, स्टेशन मास्टर पंचोली व आरपीएफ चे राजेश उबाळे व रामा उमप यांनी दीप प्रज्वलन करून महामानवाला अभिवादन केले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राहुल नाटकर यांनी सर्वांना सामुदायिक बुद्ध वंदना दिली या वेळी वंचितचे शहर सल्लागार तथा पत्रकार अशोक ठोके, संघटक प्रदीप साळवे, सचिव बाळासाहेब कदम, गौतम लहाने, संपत हिवाळे, विकास उमप, बाळू लाटे उपस्थित होते.

