न्यूव स्टार बोद्ध मंडळाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे यांचे हस्ते ध्वजारोहन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील राजाराम खांदला येथे आज दिनांक 6 डिसेंबर रोजी न्यूव स्टार बोद्ध मंडळाच्या वतीने संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र आदरांजली अर्पण करून बुध्द वंदना घेण्यात आले आहे. आणि मेनबत्ती घेऊन शांतता रॅली काढण्यात आली.
या कार्यक्रमाचा अध्यक्ष साईनाथ दुर्गे यांचा हस्ते ध्वजारोन करण्यांत आले आहे. प्रमूख पावणे म्हणून जयराम दुर्गे यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या क्षणापर्यंत केलेला संघर्ष बदल मौलाचे मार्गदर्शन केले. या वेळी मोठ्या प्रमाणात बौध्द उपासक, उपासिका महापरीनिर्वाण दिवसाला उपस्थित होते. यावेळी सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी मनोज आकदर, तिरुपती दुर्गे, गोविंदा गोंगले, सुधाकर गोंगले, भीमराव गोंगले, मधुकर गोंगले, राजेश दुर्गे,व्यंकटेश गोंगले, संतोष दुर्गे, सोनलाल बोरकर, विलास दुर्गे, किशोर गोंगले, सदाशिव गोंगले, उमाजी शेगावकर, व्येकटेश दुर्गे, भास्कर दुर्गे, अशोक शेगावकर, धनंजय शेगावकर, गणपत दुर्गे, बापू दुर्गे, बोन्दय्या दुर्गे, भानेस ओनपाकलवार, प्रमोद दुर्गे, राजु दुर्गे, तुळशीराम झाडे, रेखा गोंगले, कविता शेगावकर, लिंबुना गोंगले, उज्वला गोंगले, राजेश्वरी दुर्गे, वंदना दुर्गे, दिक्षा झाडे सह शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.

