विश्वनाथ जांभूळकर, एट्टपल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील तिघाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हात खळबळ उडाली आहे.
भामरागड तालुक्याच्या ताडगाव पोलीस मदत केंद्र हद्दीतील गुंडापुरी गावात एकाच कुटुंबातील नात, आजोबा आणि आजीची निर्घृण हत्या झाली आहे. देऊ दसरू कुमोटी वय 60 वर्ष, बिच्चे देऊ कुमोटी वय 55 वर्ष व नात अर्चना रमेश तलांडी वय 10 वर्ष या तिघांची त्यांच्याच शेतात अज्ञातांनी हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडचिरोली जिल्हात सध्या धान कापनी व मळणीचा हंगाम सुरू असून आजोबा, आजी व नात आपल्या शेतातील झोपडीत राहून धान कापनीची कामे करीत होते, सदरच्या हत्या नरबळी अथवा आपसी वादातून झाल्या असल्याचा अंदाज नागरिकांमधून वर्तविण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास ताडगाव पोलिसांकडून केला जात आहे.

