मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथील निशानपुरा वार्डमधील ऐतिहासिक कालभैरव मंदिराच्या गाभाऱ्याचा जीर्णोद्वार आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते पार पडला. कुणावर यांनी मातोश्री स्वर्गीय सौ आशाताई त्रेबकराव कुणावार यांच्या स्मृती निमित्त सदर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बांधकामा करिता पाच लाखाची देणगी प्रदान केली होती. यातून गाभाऱ्याचा जीर्णोद्धार करण्यात आला.
हिंगणघाट शहरातील सुमारे दीडशे ते दोनशे वर्ष प्राचीन कालभैरवाचे हे ऐतिहासिक मंदिर असल्याचे मानले जाते. कालभैरवाची मूर्ती ही खोलात गेल्याने पूजाअर्चा व धार्मिक विधी करण्याकरीता अडचणीचे ठरत होते. त्यामुळे सदर मूर्तीच्या चौथाराचे बांधकाम करून त्यावर आकर्षक गाभाऱ्याची निर्मिती करण्यात आली.
यापूर्वी मंदिराचे बांधकामाकरीता सुद्धा आ. कुणावार यांनी मोलाचे सहकार्य केले होते. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या बांधकामामुळे संपूर्ण मंदिराचा काय पालट झाला असून भाविक भक्तांकरीता सोयीचे झाले आहे. तसेच मंदिर व गाभाऱ्याला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, माजी नगरसेवक प्राध्यापक किरण वैद्य, रवी उपासे, अनिल अवस्थी, संजय मगर , भेंडे गुरुजी, मिलिंद काळे, माजी नगरसेविका वैशाली सूरकार, माजी नगरसेवक धनंजय बकाने, सनी बासनवार, गौरव तांबोळी, देवेंद्र पडोळे, अमोल त्रिपाठी, मिलिंद काळे आदी सह कालभैरव बाबा नाथ चौक मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.