प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- समुद्रपूर येथील डि.बी. पथक व गृहरक्षक दलाचे सैनिक यांनी परीसरातील मौजा गणेशपुर पारधी बेडा येथे वॉशआउट मोहिम राबविली असता, मोहिमेदरम्यान बेड्यालगत असलेल्या झुडपी शिवारात झुडपात लपवुन असलेले व जमिनीत गाढुन असलेले एकुण 58 प्लास्टीक व लोखंडी ड्रममध्ये अंदाजे 6,450 लीटर कच्चा मोहा सडवा रसायण, 12 प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे 240 लीटर मोहा दारू, 3 पोत्यामध्ये अंदाजे 60 किलो गुळ, 3 जर्मन घमेले व भट्टी साहित्य असा जु.किं. 3,76,100 रूपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने, संपुर्ण मुद्देमाल जप्त करून, जागीच नाश करण्यात आला तसेच 4 आरोपी विरूध्द दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेंगावकर यांचे निर्देशाप्रमाणे पो. हवा अरविंद येनूरकर, पो ना रवी पुरोहित,राजेश शेंडे, सचिन भारशंकर, वैभव चरडे व गृहरक्षक दलाचे सैनिक यांनी केली.

