उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड पुणे च्या वतीने विश्वरत्न महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापिनिर्वाण दिनाच्या निमित्याने अभिवादन करण्यात आले.
6 डिसेंबरला भारताच्या भाग्य विधाते कोटी कोटी दलित वंचित समाजाचे उद्भाधारक भारतीय संविधानाचे शिल्पकार याचे महापरिनिर्वाण दिन त्यामुळे भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे महिला व पुरुष कार्यकारणीच्या वतीने डॉ. बाबासाहेब याच्या पुतळ्यास महिला विभाग जिल्हा अध्यक्षा रेखाताई ढेकळ यानी पुष्पहार अर्पण केला. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होत. या रक्तदान शिबिरात अनेक नागरिकांनी रक्तदान केले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुर्यवंशी सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणीचा उजाळा दिला आणि शेवटचे पाच दिवस कसे गेले ते सांगितले त्याच प्रमाणे आभार भीमराव ढोबळे सर यांनी मानले.
या अभिवादन कार्यक्रमासाठी भारतीय महासभा पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा अध्यक्ष कांबळे, कोषाध्यक्ष भीमराव ढोबळे संस्कार उपाध्यक्ष डी व्ही सुरवसे महिला अध्यक्ष रेखाताई ढेकळे, सरचिटणीस सुजाता नवघरे, केंद्रीय शिक्षिका आनुसया कांबळे, अनिता क्षीरसागर, कल्पना कांबळे संस्थेचे सर्व पदाधिकारी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब अमर रहे घोषणांनी परिसर दुमदुमला.