Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अंबाजोगाईत दिवसा ढवळ्या भररस्त्यावर हत्याने खळबळ; रोडवर थरार भररस्त्यात तरुणाचा मृतदेह.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 8, 2023
in क्राईम, बीड, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंबाजोगाईत दिवसा ढवळ्या भररस्त्यावर  हत्याने खळबळ; रोडवर थरार भररस्त्यात तरुणाचा मृतदेह.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हा तून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील अंबाजोगाईत येथे दिवसाढवळ्या भररस्त्यावर तरुणाची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे. मोंढा येथील रोडवर हा हत्येचा थराराने अनेक लोकांच्या शरीरात थरकाप उडाला.

शिक्षणाचे आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंबाजोगाई शहरात आज भरदिवसा वरदळीच्या ठिकाणी एका 37 वर्षीय तरुणावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करत त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडल्याने अंबाजोगाईत एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना ही छत्रपती शिवाजी महाराज चौका लगत असलेल्या मोंढा रोडवर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मयत झालेल्या तरुणाचे नाव राजेंद्र श्रीराम कळसे असे सांगण्यात येत असून ही हत्या जमीनीच्या वादातून झाल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात येत आहे. हल्लेखोर हे राजेंद्र कळसे यांचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते.

प्राप्त माहितीनुसार अंबाजोगाई शहरातील महसूल कॉलनी भागात राहणारे 37 वर्षीय राजेंद्र श्रीराम कळसे हे आज सकाळी अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या मोंढा रोडवर आले होते. त्याठिकाणी त्यांच्या मामाचे घर आणि दुकान असल्याचे सांगण्यात येते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक तीन ते चार जणांनी राजेंद्र कळसे यांच्यावर लाठ्या काठ्याने हल्ला चढवला. दगडानेही मारहाण करण्यात आली. तब्बल अर्धा ते एक तासाच्या या हल्ल्यात राजेंद्र कळसे जागीच ठार झाले. भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी अंबाजोगाई शहरात तरुणाची हत्या घडून आल्याने भल्या थंडीत शहरातलं वातावरण गरम झालं. घटनेची माहिती अंबाजोगाई पोलिसांना कळताच घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला राजेंद्र कळसेंचा मृतदेह तात्काळ रुग्णालयामध्ये हलवण्यात आला. हल्लेखोर हे कळसे यांचे नातेवाईक असल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात येते. सदरची हत्या ही जमीनीच्या वादातून झाल्याचेही सांगण्यात येत असून हल्लेखोरांमध्ये नेमके कोण आणि किती जण होते. हे मात्र समजू शकले नाही. घटना घडल्यानंतर अंबाजोगाई पोलीस सतर्क झाली असून आरोपींचा शोध घेत असल्याचे सांगितले जाते.

Previous Post

भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड पुणे महिला व पुरुष कार्यकारणीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादन.

Next Post

विनयभंगाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता, हिंगणघाट न्यायालयाचा निकाल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
विनयभंगाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता, हिंगणघाट न्यायालयाचा निकाल.

विनयभंगाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता, हिंगणघाट न्यायालयाचा निकाल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In