मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- महिलाचे हात पकडून व छाती दाबून आणि मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिल्याचे आरोप असलेल्या प्रकरणात स्थानिक न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी-3 श्री देशपांडे यांनी आरोपी मनोज जनबंधु याला निर्दोष सुटका करण्याचे आदेश दिले.
फिर्यादीची तक्रारीनुसार, आरोपी मनोजने फिर्यादी महिलाचे हात पकडुन तीची छाती दाबली आणि तीचे लहान मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिली अशी तक्रार पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे केली. तिच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी भा.दं.सं. ची कलम 354, 354(अ), 294, 504 आणि 506 अन्वये अपराध आरोपी मनोज विरुद्ध नोंदविला.
सदर प्रकरणात पोलिसांनी तपास केला आणि त्यांना सबळ पुरावा मिळून आल्याने त्यांनी प्रकरण न्याय प्रविष्ठ केले. आरोपीने अपराध केल्याचा नकार दिला, त्यामुळे कोर्टात प्रकरण सुरू झाला. अभियोजन पक्षाने एकूण 04 साक्षदार तपासले. तसेच आरोपीने 02 साक्षदार तपासले. यावेळी अभियोजन पक्षाने सर्व साक्ष- पुरावे सादर केले.
आरोपीचा पक्ष एड. इब्राहीम हबीब बख्श यांनी मांडले. एड. बख्श यांनी तक्रार आणि आरोप पत्रातील अनेक त्रुटी, तक्रारीला करण्यात झालेला विलंब व साक्षदारांचे बयाणातील तफावत कोर्टासमोर मांडली आणि म्हणाले कि, सदर रिपोर्ट खोटी आहे. दोन्ही पक्षांचे साक्ष-पुरावे आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर विद्वान न्यायाधीशांनी आरोपी मनोज जनबंधू याला प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. आरोपी कादून एड. इब्राहीम हबीब बख्श यांनी काम पाहिले व त्यांना एड. राहत सादिक पटेल, एड. अश्विनी प्रकाश तपासे व एड. अस्मिता अरविंद मुंगल यांनी सहकार्य केले.