Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राजुरा वनोद्यानाचे होणार कायापालट, ३७ लाख ६१ हजार रुपयाची प्रशासकीय मान्यता.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 15, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
राजुरा वनोद्यानाचे होणार कायापालट, ३७ लाख ६१ हजार रुपयाची प्रशासकीय मान्यता.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पालमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार; देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नाला यश!

तिरुपती नल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मोबा. 9822477446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- धकाधकीच्या जीवनापासून थोडी उसंत म्हणून प्रत्येकाला काही ना काही विरंगुळा हवा असतो. मग ते लहान असोत वा मोठे जीवनाचा अविभाज्य भाग असलेला हा निवांतपणा घालविण्यासाठी राजुरा शहरालगत वनोद्याना उभारण्यात आले. मात्र त्या उद्यानामध्ये सुविधांची वाणवा असल्याचे चित्र दररोज सकाळी मार्निंग वॉकसाठी व फिरण्यासाठी जाणा-या नागरीकांना बघायला मिळत होती. येथिल दुरावस्थेला पाहुण अनेक नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे, या उद्यानात नागरीकांसोबत फिरण्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे भाजपा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे जात असता त्यांना या वनोद्यानात सुविधेचा अभाव व दुरुस्तीची गरज असल्याचे दिसल्यामुळे त्यांनी या उद्यानाला नवसंजिवणी देण्यासाठी पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निधीची मागणी लावून धरली व नुकताच वनोद्योनाच्या दुरुस्ती करीता ३७ लक्ष ६१ हजार रुपये किंमतीच्या प्रशासकीय मान्यतेचा आदेश निघाला असल्यामुळे राजुरा शहरातील नागरीकांनी देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहे.

वनउद्यानाच्या निर्मितीनंतर अजून पर्यंत त्या ठिकाणी दुरुस्ती न झाल्याने उद्यानाची वाईट अवस्था झाली आहे. उद्यानाअंतर्गत रस्त्याची दयनावस्था, ठिकठिकाणी वाढलेले गवत, सुशोभिकरण केलेलेल्या पिकनिक स्पॉटची दुरावस्था, बसण्यासाठी मोडकळीस आलेले बाके, लहान मुलांसाठी खेळण्याकरीता असलेल्या साहित्यांची तुटफूट, सोबतच फाउंटन दुरुस्ती, वनोद्यानात अंडरग्राऊंड पाईप लाईनचे काम, नविन फुलझाडांची लागवड, ट्राक दुरुस्ती, संरक्षणभिंत दुरुस्ती, सौच्छालयासह इतर साहित्यांच्या दुरुस्तीची गरज असून येथे जेष्ठ नागरीकांसह लहान मुलांना फिरणे अवघड झाले आहे. या वनोद्यानाच्या निर्मितीनंतर याकडे कोणीही लक्ष दिले नसल्यामुळे या उद्यानाची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी सोईसुविधांची उभारणी होऊन लहान मुलांना नाच-बागडणे आणि किलबिलाटाने उद्यान पुन्हा कधी गजबजणार असा प्रश्न नागरीक करीत होते.

तत्पूर्वी याठिकाणी नागरिकांना फिरण्यासाठी ट्राक नसल्यामुळे तात्काळ विभागामार्फत दुरुस्ती करण्याची मागणी विभागीय वान अधिकारी श्वेता बोड्डू यांना केली होती त्यानुसार इतर किरकोळ दुरुस्त्या करण्यात आल्या. मात्र यासर्व दुरुस्ती करिता निधीची गरज असल्याने निधीची पुर्तता करण्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे भाजपा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा, विभागीय वन अधिकारी श्वेता बोड्डू यांच्यासोबत बोलून पालकमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निधीकरीता पाठपुरावा केला. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी जिल्हा नियोजन समितीत राजुरा वनोद्योनाच्या दुरुस्तीकरीता ३७ लक्ष ६१ हजार रुपये किंमतीच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असून तसा नुकताच आदेश निघाला आहे. यामुळे राजुरा वनोद्यानाला नवसंजिवणी प्राप्त होणार आहे. यात वनोद्यानाअंतर्गत रस्ते, सोबतच फाउंटन दुरुस्ती, वनोद्यानात अंडरग्राऊंड पाईप लाईनचे काम, नविन फुलझाडांची लागवड, ट्राक दुरुस्ती, संरक्षणभिंत दुरुस्ती, सौच्छालय दुरुस्तीसह इतर कामे केली जाणार आहे. वनोद्यानाला निधी मिळवून दिल्याबद्दल राजुरा शहरातील नागरीकांनी देवराव भोंगळे यांचे आभार मानले आहे.

Previous Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दहावे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन रविवारला हिंगणघाट मध्ये.

Next Post

मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय थांबवा: उमेश इंगळे यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय थांबवा:  उमेश इंगळे यांची मागणी.

मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय थांबवा: उमेश इंगळे यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In