जळगाव जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव:- जिल्हातील चोपडा तालुक्यातुन एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्याच पत्नीची धारदार शस्त्राने वार करत निर्घृण हत्या केली त्यामुळे परिरसात एकच खळबळ उडाली आहे. रेखाबाई दुरसिंग बारेला वय 44 वर्ष असं हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव असून दुरसिंग बारेला वय 47 वर्ष असे आरोपी पतीचे नाव आहे.
आरोपी पतीने आपल्याच पत्नीची कुटुंबीक वादातून निर्घृण हत्या केली. आपल्याच पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती हा फरार झाला होता पण पोलिसांनी तपास करून संशयित आरोपी पती दुरसिंग बारेला याला बेड्या ठोकल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील धनवाडी येथील योगीराज पाटील यांच्या शेतात दुरसिंग बारेला व पत्नी रेखाबाई बारेला यांच्यामध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास काहीतरी कारणावरून वाद झाला हा वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात पतीने आपल्याच पत्नीवर धारदार शस्त्राने वार करीत तिची हत्या केली. या हत्या केल्यानंतर संशयित आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला होता तर मुले आईच्या मृतदेहाजवळ बसून होती.
मंगळवारी सकाळी हत्येचा प्रकार समोर आल्यानंतर चोपडा पोलिसांनी धाव घेतली. चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, गणेश सोनवणे यांनी 24 तासात हत्याची उकल करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी चोपडा पोलिस स्टेशन येथे विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

