संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो न 9923497800
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- भोई समाजाचे नेते तथा राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष ॲड.अमोल बावणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश राज्याच्या राज्य संघटक पदी नियुक्ती झाली आहे.
ॲड.अमोल बावणे यांचे संघटनात्मक कार्य चांगले आहे त्यांची समाजावर संघटनात्मक कार्याची पकड चांगली असून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामधील २०१९ मध्ये वरोरा, भद्रावती विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी कडून विधानसभा निवडणूक लढविली होती. ॲड. अमोल बावणे हे भोई समाजाचे नेते व उच्चशिक्षित युवा तरुण तडफदार नेतुत्व असून त्यांचे संघटनात्मक कार्य खूप मोठे आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य संघटक अविनाश काकडे यांनी ॲड.अमोल बावणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या राज्य संघटक पदी निवड केली असून त्यांना चंद्रपूर, गडचिरोली, गोदिया, भंडारा व नागपूर या जिल्हातील संघटनात्मक कार्याची जबाबदारी दिली आहे. तसेच पक्षाचे धेय्य धोरण सर्वसामन्य नागरीका पर्यंत पोहचविण्यासाठी, पक्ष बळकटीकरणाची व पक्ष संघटन कार्य वाढविण्याची फार मोठी जबाबदारी दिली आहे.