पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका घरमालकाने किरायाने घर घेऊन राहणाऱ्या विवाहित महिलेवर बलात्कार केल्याच्या घटनेने नागपुर शहर हादरले आहे.
नागपुर शहरात किरयाने रूम करून राहणाऱ्या महिलेवर पती घरी नसताना घर मालकाकडून बलात्कार करण्यात आला. यावेळी या नराधमाने याची वाचता केली तर जीवे मारण्यास धमकी दिली. महिलेला वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. त्यामुळे पिढीत महिलेने पती घरी आल्यानंतर ही बाब त्याला सांगितली.
पतीच्या निर्णयानंतर यशोधरानगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महेश नामदेव घोगरे वय 29 वर्ष राह. यशोधरा नगर याला अटक केली. पीडित ३० वर्षीय महिला गृहिणी असून तिला दोन मुले आहे. तिचा पती खासगी नोकरी करीत असून तो वारंवार बाहेरगावी मुक्कामी असतो. याच संधीचा फायदा घेऊन घरमालक महेश घोगरेने तिच्याशी संबंध वाढवले. तिचा मोबाईल क्रमांक घेऊन तिच्याशी संपर्कात राहायला लागला. त्याने तिला अनेकदा शारीरिक संबंधाची मागणी केली.
मात्र, तिने प्रत्येक वेळी नकार दिला. महिलेने घरमालकाच्या त्रासाला कंटाळून घर बदलण्याचा निर्णय घेतला. १७ नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता महिला घरात एकटी होती. महेशने घरात प्रवेश केला आणि तिला बळबजरी शारीरिक संबंधाची मागणी करीत होती. त्यावेळी त्याने महिलेची पतीकडे बदनामी करण्याची धमकी दिली. महेशने तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. त्यानंतर तो तिला वारंवार शारीरिक संबंधासाठी तगादा लावत होता. गावावरून पती परत आल्यानंतर महिलेने घडलेला प्रकार सांगितला. पतीने तिला धीर दिला आणि यशोधरानगर पोलीस ठाण्यात नेले. तेथे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

