रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:-परतूर तालुक्यातील मौजे सावरगाव दु. (संगमेश्वर) व मौजे गोळेगाव येथील गोदावरी नदीपात्रातून विना परवाना रेती उपसा केल्या जात आहे. गेल्या दोन महिन्यापासून मौजे सावरगाव बु. (संगमेश्वर) व मौजे गोळेगाव ता. परतूर येथील गोदावरी नदीपात्रातून विना परवाना रेती ऊपसा राजरोजपणे केला जात आहे. सदरील प्रकाराबाबत तहसिलदार परतूर यांना तोंडी कळविले असून सुध्दा त्यांनी कुठल्याही प्रकारे कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या दोन महिन्यापासून ते आज पर्यंत मौजे सावरगाव बु. (संगमेश्वर) व गोळेगाव नदीपात्रातील जवळपास दोन कोटी पेक्षा जास्त मालमत्तेची वाळू उपसा केला गेला आहे. तरी सुध्दा प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. सदरील प्रकरणात प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून वाळूरेती ऊपसाधारकांवर कार्यवाही करावी व आळा बसविण्यात यावा, अन्यथा दलीत पँथर सेना यांचे वतीने आपल्या कार्यालयासमोर तिव्र अंदोलन करण्यात येईल. करीता दलीत पँथर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

