आंद्रुड गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांवर खोटा ठराव केल्याप्रकरणी कार्यवाही करावी याबाबत उस्मानाबाद पोलिस अधीक्षक यांना निवेदन.
प्रशांत जगताप, प्रतिनिधी
उस्मानाबाद:- जील्हातील भूम तालुक्यातील मौजे आंद्रुड येथून एक बातमी समोर आली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सोपान गिते याने ॲट्रॉसिटि कलमांतर्गत गुन्हा दाखल असल्याचा राग मनात धरुन जाणुन बुजून बदनामी कारक ग्रामपंचायतचा ठराव घेवून न्यायालयाची दिशाभुल करत असल्या प्रकरणी चौकशी करून आंद्रुड गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांवर खोटा ठराव खोटा करणा-यांवर कार्यवाही करावी म्हणून मीना दिलीप ओव्हाळ यांनी उस्मानाबाद पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले.
या निवेदनात माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सोपान गिते, आंद्रुड गावातील सरपंच आणि ग्रामसेवकांवर गंभीर असे आरोप करण्यात आले आहे. मीना दिलीप ओव्हाळ दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,
मी आंद्रुड या गावची रहिवाशी असून मी माजी सैनिकांची पत्नी आहे. मौजे आंद्रुड येथील रहिवाशी व माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सोपान गिते यांच्या विरोधात न्यायालयात ॲट्रॉसिटि कलमांतर्गत कार्यवाही केल्याचा राग मनात धरुन ज्ञानेश्वर सोपान गिते यांची पत्नी आंद्रुड ग्रामपंचायतच्या विदयमान सरपंच असल्याने त्याचा गैरफायदा घेवून व ग्रामसेवकाला हाताशी धरून खोटा आणि नको ते खोटेनाटे आरोप करणारा ठराव माझ्या विरोधात घेवून तो न्यायालयात दाखल केला आहे. यामुळे एक प्रकारे या सर्वांनी न्यायालयाची देखिल दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे.
सदर ठरावामध्ये ज्ञानेश्वर सोपान गिते यांची पत्नी सौ. वर्षा ज्ञानेश्वर गिते व आंद्रुड ग्रामपंचायतच्या सरपंच आसून त्यांनी ग्रामसेवक मुडे साहेब यांना हाताश धरुन ठराव घेतला आहे. या ठरावामध्ये मी मुंबई, ठाणे येथे वेश्या व्यवसाय व देहविक्री करते, तसेच गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे. आंद्रुड गावातील महिला तरुण मुली बिघडवल्या आहेत अशा प्रकारचा खोटानाटा मजकूर लिहिला आहे. मजकूरामुळे ख-या अथाने माझी बदनामी व मानहानी केली आहे.
अशी महिलेची बदनामी करणाऱ्या सरपंच ग्रामसेवक सदरी खोटानाटा व माझ्यावर अश्लिलतेच शिंतोडे व मानहानीकारक दिलेला ठराव आणि त्यातील संपूर्ण मजकूर मी स्वतः भूम येथील न्यायालयात पाहिलेला आहे व वाचलाहि आहे. त्याची खात्री करूनच मी सदर आजरोजी हा अर्ज देत आहे. या निवेदनाचा विचार करुन तात्काळ चौकशी करावी व संबंधित सरपंच, ग्रामसेवक व अँट्रॉसिटि प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर सोपान गिते यांचेवर कार्यवाहि करावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून मीना ओव्हाळ यांनी केली आहे.