उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंदखेडराजा:- साखरखेर्डा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका प्रेमी युगालाची एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. ही घटना आज 22 डिसेंबर रोजी उघडकीस आली. प्रेमाला घरच्यांचा विरोध असल्याने अखेर या प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. एका सोबत जगू शकत नाही म्हणून या प्रेमी युगलानी गळ्यात गळे घालून या जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे या घटनेतील मुलगी केवळ 8 व्या वर्गात शिकणारी 13 वर्षाची विद्यार्थिनी आहे. हे दोघेही गेल्या 4 दिवसापासून बेपत्ता होते.
प्राथमिक माहितीनुसार मुलीचे नाव साक्षी संतोष अंभोरे 13 वर्ष तर मुलाचे नाव गोपाल समाधान खिल्लारे वय 22 वर्ष असे आहे. दोघेही शेंदुर्जन येथील रहिवासी आहे. साखरखेर्डा शिवारातील एका झाडाला दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघेही 18 डिसेंबर पासून बेपत्ता होते. मुलीच्या आईने 18 डिसेंबरला साखरखेर्डा पोलीस ठाण्यात त्यांची मुलगी गायब झाल्याची तक्रार दिली होती. त्यावरून त्याच दिवशी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान आज 22 डिसेंबरला संध्याकाळी एका मुलीचा आणि मुलाचा मृतदेह एकच झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली.
यावेळी पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर दोघांची ओळख पटली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने प्रेमात अडथळा येत होता, त्यामुळेच हा टोकाचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता आहे. गेल्या 4 दिवसांपासून दोघे गायब असल्याने त्यांनी आत्महत्या कधी केली याबाबत अस्पष्टता आहे. यावेळी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानंतर आत्महत्या कधी केली हे समोर येणार आहे.

