रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- जिल्हातील परतूर तालुक्यातुन एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. तालुक्यातील एका गावात शासनाने पंचनामा करून जप्त केलेली रेतीची साठा गावातील सरपंचाने अवैधरित्या विक्री केल्याची आरोप गावातील नागरिकांनी लावला आहे.
परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथे दिनांक 28 जून 2023 रोजी महसूल विभागाला गट क्र. 31 मधील शेतजमीनी मध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा मिळून आला होता त्यात अंदाजे 22 ब्रॉस रेती साठा होता. या रेती साठाचा पंचनामा करुन संबंधीत रेती ही गट क्र. 31 मध्ये स्टॉक होता.
परंतु तेथे बिएसएनएल टॉवरचे काम चालू आहे, तरी सदर रेती सरपंच यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन व शासनाचे सर्व नियम डावलून 2500 रुपये ब्रॉस प्रमाणे संबंधीत व्यक्तीस 10 ते 15 ब्रॉस रेती विक्री केली आहे व संबंधीत रक्कम सरपंच यांच्या भावाचे नावे बैंक खात्यावर पाठविली आहे. त्यामुळे या रेतीसाठा विकून सरपंचाने शासनाला चुना लावून मालामाल झाला आहे.
त्यामुळे गावातील काही नागरिकाचा हे प्रकरण लक्षात येताच त्यांनी प्रशासनाला कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. त्यात म्हटल आहे की, रेतीची अवैध खरेदी संबंधीत व्यक्तींचा जबाब घेऊन सरपंच यांचेवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी. तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांना सदर गट नं. 31 मध्ये पाठवून रेती साठ्याचा स्थळपाहणी पंचनामा करावा व सरपंच व संबंधीत रेती खरेदी करणारे यांचे जबाब घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी दिपक काळे उपसरपंच, चंद्रभान मुळे माजी सरपंच, विष्णू जगताप, भारत पंडित यांनी यावेळी निवेदनातून केली.

