महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- भारतात विविध सण-उत्सव साजरे करण्यात येत असतात. प्रत्येक धर्मातील सण, उत्सव, संस्कृती, परंपरा वेगवेगळ्या असतात. पण सर्वधर्म समभाव म्हणून प्रत्येक सणाला भारतात फार महत्व आहे. ख्रिश्चन धर्मीयांसाठी ख्रिसमस हा फार महत्त्वाचा आणि मोठा सण असतो. ख्रिसमसला नाताळ म्हणून सुद्धा ओळखण्यात येते. जगभरात नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 25 डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्त यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.
त्याचमुळे नाताळ सणाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर खुर्द येथे नाताळ उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी बोलताना पास्टर सुरेश कदम शाळेच्या मुख्याध्यापिका साबळे मॅडम, बोर्डी सर, धिरडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुंदरनाथ शेजुळ, सरपंच दगडू शेपाळ, गावातील कार्यकर्ते रामनाथ शिंदे, संपत पवार, बाळू शेळके, शांताबाई शेळके, विजय मोरे अनेक मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी पास्टरानी शाळेतील मुलांना नाताळ निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था केली व त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.