🖋️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- गणपती विसर्जनाच्या दिवशी नाशिक जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुसळधार पावसाने एका कुटुंबाला अनाथ केलं आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने अनेकांच्या डोळे पाण्याने ओल्या झाले आहे.
नाशिक शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस होत असतांना भगूर-देवळाली जवळ असलेल्या वंजारवाडी गावात एक घर कोसळले. त्यात मुलांचा जीव वाचला पण पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे वंजारवाडी येथील गवारे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या दुर्दैवी घटनेत छबू सीताराम गवारे आणि मंदा छबू गवारे यांचा मृत्यू झाला आहेत, तर तीन मुली आणि एक मुलगा यांचा जीव वाचला आहे. दरम्यान घटनास्थळी देवळाली कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
घटनेचे माहिती स्थानिक आमदार सरोज अहिरे यांना मिळताच यांनी गवारे कुटुंबाच्या घराकडे धाव घेतली, घटनेची माहिती घेत सरकारकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
छबू गवारे हे पत्नी मंदा यांना घेऊन मोलमजुरी करत आपला उदरनिर्वाह करत होते. तीन मुली आणि एक मुलगा असा त्यांचे कुटुंब होते. मात्र नियतीने त्यांच्या कुटुंबावर घात केला. मुसळधार पावसाने गवारे दाम्पत्याचा बळी घेतला.
गवारे दाम्पत्यांना तीन मुली आहेत त्यापैकी मोठी मुलगी ही नववीला शाळेत आहेत. तर दोन मुली या प्राथमिक शिक्षण घेत असून एक मुलगा हा पाच वर्षांचा आहे. नकळत्या वयात चिमूरड्यांवरील आई वडिलांचे छत्र उडालय.
गवारे दाम्पत्यांचा अंत्यविधी लोकप्रतिनिधींच्या आणि गावकरांच्या सहकाऱ्याने पार पडला असला तरी प्रशासकीय अधिकारी देखील घटनास्थळी पोहचत माहिती घेत आहे. अनाथ झालेल्या या मुलांना आता शिक्षण, राहणे आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी कुणाकडे द्यायची याबाबत माहिती घेतली जात आहे.
स्थानिक आमदार सरोज अहिरे यांनी शासनाच्या गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू केलेल्या शेतकरी अपघात योजनेचा लाभ आणि शबरी आवास योजने अंतर्गत घरकुल देण्याच्या बाबत प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गवारे कुटुंब ही आदिवासी असल्याने त्या मुलांना आश्रमशाळेत ठेऊन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी शासन पातळीवर घेता येईल का ? याबाबत देखील आमदार अहिरे या प्रयत्नशील आहे. घडलेली घटना बघून संपूर्ण गावच नव्हे पंचक्रोशी सुन्न झाली आहे. लहान-लहान मुलं असल्सयाने आपले आई वडील मृत्यू झाले आहेत याची देखील कल्पना नसल्याने मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.