मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधि
अहेरी:- अहेरी तालुक्यातील मौजा – रेपनपली येथे सण २००५ पुर्वी अतिक्रमण केलेले शेतकऱ्यांना वन विभागाकडून जीपी आर एस नकाशा देत आहेत मात्र नकाशा सत्यप्रतित देत नाहीत त्यामुळे अडचण निर्माण होत होती. त्यामुळे आज रेपनपली येतील वन हक्क धारक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या भेट घेवून यांबाबत सविस्तर चर्चा केली. तेंव्हा अध्यक्ष यांनी तोडगा काढण्यात येईल म्हणून सांगितले. यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळेल याची काही गॅरंटी नाही. असे म्हणाले तसेच वैयक्तीक वन हक्क दाव्याचे अर्ज कसा भरायचे हे सुध्दा शेतकऱ्यांना समजावून संगण्यात आला.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री. भास्कर तलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अजय नैताम रेपनपली येतील कार्यकर्ते उपस्थित होते.