हनिशा दुधे, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हात मागील काही दिवसांपासून दुचाकी मोटर सायकल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने तीन चोरास बेड्या ठोकल्या आहे. या चोरा कडून 9 दुचाकीसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील दुचाकी चोरीची घटनांना आळा बसावा, यासाठी पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले होते. पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी निर्देशांची अंमलबजावणी करीत विशेष पथक स्थापन केले.
या पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नावे तपासली, गोपनीय बातमीदार नेमले. 2 जण हे विना कागदपत्रांची व विना नंबरची मोटारसायकल विक्री करीता बायपास चौक येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. अक्षय भलमे वय 24 वर्ष, मंगेश मडावी वय 19 वर्ष, रा. गडचिरोली व रोहित लोनगाडगे 19 वर्ष यांची चौकशी केली असता त्यांनी विविध पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहन चोरी केल्याचे कबुली दिली.
यावेळी आरोपीकडून राजुरा, बल्लारशाह, कुरखेडा, आष्टी, मुलचेरा, गडचांदूर अशा एकूण 9 दुचाकीसह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांची टोळी विविध जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीत जात दुचाकी वाहन चोरी करीत होते. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली महेश कोंडावार व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली.