हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील वरोरा तालुक्यातील पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार – गिरोला या रस्त्यासाठी शेतकरी 25 वर्षांपासून मागणी करीत आहेत. अनेकदा आंदोलन करून निवेदन देण्यात आली आली मात्र, या रस्त्याच्या मागणीकडे शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत रविवार, 24 डिसेंबर रोजी आंदोलन कर्त्यानी भीम आर्मी संविधान संरक्षक दलाच्या वतीने जिल्हाधिकारी यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
पाजरेपार रीठ ते आबमक्ता व पाजरेपार – गिरोला या रस्त्यासाठी 19 डिसेंबरपासून भीम आर्मी संरक्षक दलाच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. अधिवेशन काळात मुख्यमंंत्र्यांचे प्रधान सचिव यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले. त्यांनी जिल्हाधिकारी यांनी आंदोलनकर्ते यांची मागणी तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश दिले. पण अद्याप मागणीची पूर्तता न झाल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी रविवारी थेट जिल्हाधिकार्यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला.
ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवू, असा इशारा भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी दिला आहे.
