वीरस्री लताताई देशमुख ह्या साने गुरुजीच्या “परार्था प्राण ही द्यावे”, या तत्वाने जीवन जगल्या असे गैरोद्गगार जमाते इस्लामे हिंद महिला विंगच्या मुमताज बी यांनी पुण्यतिथी कार्यक्रमात काढले.
उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- स्वामिनी विधवा विकास मंडळाच्या संस्थापिका आणि असंख्य निराधार, एकल महिलांच्या प्रेरणास्थान वीरस्री स्व. लताताई देशमुख पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्वामिनी विधवा विकास मंडळ आणि स्वामिनी संघटना अकोला यांचे वतीने स्वामिनी कार्यालय, कुणाल कॉम्प्लेक्स, रणपिसे नगर चौक, अकोला येथे सोमवारी दि. २५ डिसेंबर रोजी दु. १ ते २ या वेळेत सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मंडळाच्या सचिव प्राध्यापक सुनीता डाबेराव या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून स्वामिनी संघटना जिल्हाध्यक्षा साधना पाटील ह्या लाभल्या होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जमाती इस्लामी हिंद संघटनेच्या मेहेजबी हुसेन आणि मुमताज बी ह्या होत्या. तर कार्यक्रमाला प्रतिभा काकडे, रंजना वारकरी, भावना अग्रवाल, मीरा वानखडे, राजाभाऊ देशमुख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात एकल महिला धोरण आणि शासकीय भूमिका याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संघटने प्रति आपले विचार व्यक्त केले तसेच विरस्त्री लतादीदी देशमुख यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक राजाभाऊ देशमुख यांनी केले. तसेच आभार मनीष देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदार जाधव, रवींद्र हिंगणकर, समृद्धी जाधव, महेंद्र अलीसार, हेमा देशपांडे, सागर मुदलियार, शीला कुकडे, मधुरा कुलकर्णी, अक्षरा सबनीस, जैतून बी बिल्कीस बानो, जुभेदाबी, प्रांजल राठोड, वेदिका देशमुख, प्रणव सुरवाडे, कोकीळा तायडे, प्रज्ञा शिरसाट, दीपा जवंजाळ, खमाज शेख आणि शर्वरी काळे यांनी परिश्रम घेतले. सर्व उपस्थितांनी मौन बाळगून सामुहिक श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.