अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोला जिल्हा स्री रुग्णालयात बुलडाणा, वाशिम, या ठिकाणाहुन मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. शासकीय रुग्णालय असल्यामुळे चांगली सुविधा मिळेल व रुग्णांच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली जाईल. या अपेक्षेने रुग्ण येतात. या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारची चांगली सुविधा मिळत नसल्याचे रुग्णांचे नातेवाईक सांगतात.
अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये डिलिव्हरी (प्रसुती) साठी आलेल्या रुग्णांना पिण्याचे पाणी व आंघोळीसाठी गरम पाणी आणि स्वच्छता गृहासाठी पैसे मोजाने लागत असल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णांची परिस्थिती नसल्यामुळे हे रुग्ण सरकारी दवाखान्यात येतात परंतु या ठीकाणी त्यांना प्रत्येक गोष्टीला पैसे द्यावे लागत आहेत. जिल्हा स्त्री रुग्नालयात रुग्ण व त्याच्या नातेवाईकासाठी पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकाना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयाचे नविन नुतनीकरण करण्यात आले त्यामध्ये रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या परंतु पिण्याच्या पाण्याची सुविधा का उपलब्ध करून देण्यात आली नाही. हा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी अन्यथा आम्ही तिव्र आंदोलन छेडु याची नोंद घ्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता तथा रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना पटोकार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता तथा रुग्णसेवक समिर खान, सामाजिक कार्यकर्ता सुमित तेलगोटे, सतिश तेलगोटे, सुरज खंडारे, सतिश इंगळे इत्यादी उपस्थित होते.