Sunday, May 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हुंडा नाही दिला म्हणून चक्क पोलिसाने आपल्याच पत्नीला वर्दीचा बेल्टने केली बेदम मारहाण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 26, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हुंडा नाही दिला म्हणून चक्क पोलिसाने आपल्याच पत्नीला वर्दीचा बेल्टने केली बेदम मारहाण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड, उपसंपादक पुणे

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्या पोलिसावर कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. त्याच पोलिसांने कायद्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. हुंडा घेणे हा कायद्याने गुन्हा असताना देखील पोलीस कर्मचाऱ्याने कायदा पायाखाली तुडवुन हुंडा मागितला पण सासरच्या मंडळींनी हुंडा न दिल्यामुळे पत्नीला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

एका पोलीस कर्मचाऱ्याने लग्नामध्ये सासरच्या लोकांकडून ठरलेल्या 5 लाख रुपये हुंड्यापैकी एक लाख रुपये कमी दिल्याच्या कारणावरून आपल्याच पत्नीला वर्दीच्या बेल्टने बेदम मारहाण केली. या प्रकरणी अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल क्र.9 दलातील पोलीस कॉन्स्टेबल विरोधात विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै 2022 ते ऑक्टोबर 2023 या दरम्यान आरोपीच्या राहत्या घरी घडला.

याबाबत विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या पीडित 28 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे सोमवारी ता. 25 फिर्याद दिली आहे. यावरुन सचिन राजकुमार खंडारे वय 29 वर्ष रा. रुपचंदनगर, वाशीम बायपास, ता. अकोला याच्यावर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्यादी यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येते तक्रार अर्ज केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन खंडारे हे अमरावती येथे राज्य राखीव पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सचिन खंडारे यांनी लग्नात पाच लाख रुपये हुंड्याची मागणी केली होती. त्यापैकी चार लाख रुपये लग्नाच्यावेळी खंडारे यांना देण्यात आले होते. परंतु एक लाख रुपये देणे बाकी होते. यावरुन फिर्यादी व सचिन खंडारे यांच्यात वाद होत होते. या वादातून आरोपीने त्याच्या वर्दीच्या बेल्टने मारहाण केली. तसेच गळ्यातील मंगळसुत्र व इतर दागिने हिसकावून घेतले. तसेच जबरदस्तीने फारकतीच्या नोटरीवर सही करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड करीत आहेत.

Previous Post

गोंडपिपरी तालुक्यातील चार ही रेती घाटातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या तस्करी.

Next Post

अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा: उमेश इंगळे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा: उमेश इंगळे

अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा: उमेश इंगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In