विदर्भ युवक सेवा सहकारी संस्था हिंगणघाट मार्फत सुरू आहे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ. गुन्हा दाखल करून कारवाई करावी पालकाची मागणी.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातुन एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. दि.२७ रोजी सुमारे ८०८ शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराअंतर्गत भात वितरीत करण्यात आला, यात चक्क अळ्या आढळल्या दिसून आल्याने ही बाब शालेय शिक्षक व विद्यार्थ्यांनी याची रीतसर तक्रार शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
आज दि.२७ रोजी दुपार पाळीतील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांकरीता शालेय पोषण आहार देण्यात आला, त्या आहारातील भातामध्ये अळ्या आढळून आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी तसेच नियमानुसार भोजनाचा आस्वाद तपासणी करणाऱ्या शिक्षकांनी शालेय प्रशासनाकडे केली.
सदर शालेय पोषण आहाराचा पुरवठा वर्धा येथील विदर्भ युवक सेवा सहकारी संस्थेमार्फत हिंगणघाट येथील केंद्रीय स्वयंपाकगृहातून पुरविण्यात येतो. या घटनेमुळे विद्यार्थ्याना देण्यात येणाऱ्या या आहाराचे विश्वसनीयतेवरती प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून या चिमुकल्या विद्यार्थ्याचे आरोग्याशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे.
या घटनेची तक्रार शालेय मुख्याद्यापक एच. पी. गुडदे यांनी गटशिक्षणाधिकारी अल्का सोनवणे यांचेकडे केली असून सदर प्रकरणी प्रशासन कोणती काय कारवाई करणार याकडे पालक व विद्यार्थी वर्गाचे लक्ष लागले आहे.
यावेळी डॉ. बी आर आंबेडकर महाविद्यालय प्रशासनाने महाराष्ट्र संदेश न्युज ला सांगितले की, वर्धा येथील विदर्भ युवक सेवा सहकारी संस्थेमार्फत हा पुरवठा करण्यात येतो. आम्ही त्यांची तक्रार प्रशासनाला केली आहे. याच्यावर प्रशासनाने योग्य कारवाई करून विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळ थांबवावा.