हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हात असणाऱ्या राष्ट्रीय वाघ उद्यानात मागील काही दिवसांपासून सतत वाघाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. त्यामुळे वण विभागावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. ताडोब राष्ट्रीय अभयरण्य येते वाघ – बिबट्यांची संख्या वाढत असताना सतत होणाऱ्या वाघाच्या मृत्यूने चिंतेत वाढ झाली.
चंद्रपूर जिल्ह्याची वाघांचा जिल्हा अशी ओळख आहे. मात्र एकामागून एक वाघांचा मृत्यू नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या होत असल्याने वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. सन २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने एका अधिसुचनेद्वारे या प्रकल्पाच्या सभोवताली संरक्षित क्षेत्र (बफर झोन) निर्माण केले आहे. एकूण ६ परिक्षेत्रात बफर झोन विभाजित आहे. या प्रकल्पालगत आणि सभोवतालचे सुमारे ११०१.७७ किमी २ क्षेत्र त्यात येते, ज्यामध्ये ७९ गावांचा अंतर्भाव आहे. मानव व वन्यप्राण्यांचा संघर्ष टळावा असा त्यामागील हेतू होता. पण सतत वाघाचे मृत्यू होत असल्याने प्रश्न निर्माण झाला आहे.
ताडोबा येथे वाघ बघण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक दररोज येत असतात. जागतिक स्थरावर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे नावलौकिक आहे. वाघाच्या संवंर्धनाची मोठी जबाबदारी वनविभागावर आहे, मात्र इतक्या कमी कालावधीत मोठ्या संख्येने वाघांचा मृत्यू झालाने वनविभागाच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न चिन्ह निर्माण होते.
अशी आहेत वाघांच्या मृत्यूचे कारणे 14 नोव्हेंबर : चिमूर वनपरिक्षेत्र- (झुंजीत मृत्यू) 18 नोव्हेंबर : ताडोबा – (नैसर्गिक) 27 नोव्हेंबर : नागभीड वनपरिक्षेत्र – (रेल्वे अपघात) 10 डिसेंबर: वरोरा वनपरिक्षेत्र- (अपघात) 14 डिसेंबर : पळसगाव वनपरिक्षेत्र- (नैसर्गिक) 21 डिसेंबर : सिंदेवाही वनपरिक्षेत्र- (विज करंट) 24 डिसेंबर: तळोधी वनपरिक्षेत्र- (विहिरीत) 25 डिसेंबर: सावली वनपरिक्षेत्र (अस्पष्ट)चंद्रपूर जिल्ह्यात जागतिक दर्जाचे ताडोबा व्याघ्र प्रकल्प असून कन्हारगाव अभयारण्य लवकरच अस्तित्वात येणार आहे. मात्र परिसरात होत असलेल्या वाघांच्या मृत्यूच्या घटना या चिंता वाढवणाऱ्या आहेत.
जंगलातील प्राण्यांची अन्नसाखळी सुरक्षित व अबाधित राहण्यासाठी जंगलातील वाघांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. वाघच नष्ट होत असतील तर जंगलाची सुरक्षा धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही. वाघांची सुरक्षा धोक्यात येत असताना वन विभागाचे अधिकारी मात्र सुस्त असल्याची बाब समोर येत आहे. वाघांचा मृत्यू होऊन कुजेपर्यंत घटना वनविभाच्या निदर्शनास येत नाही. त्यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनांची उच्चस्थरीय चौकशी करण्याची मागणी प्राणी प्रेमींकडून करण्यात येत आहे.

